शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

हिंजवडी-माणमधील कंपन्यांकडून ‘आयटीयन्स’ना सुटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 19:12 IST

मुळशी आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मुळा, मुठा आणि पवनानदी दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते, बंधारे, पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर हिंजवडी - माण आयटी पार्कमधील आयटी कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून कर्मचाऱ्यांना नियमित वेळेपेक्षा लवकर कंपनीतून सोडण्यात आले.

ठळक मुद्देहिंजवडी-माणमधील कंपन्यांकडून ‘आयटीयन्स’ना सुटी बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले : सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय

हिंजवडी : मुळशी आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मुळा, मुठा आणि पवनानदी दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते, बंधारे, पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर हिंजवडी - माण आयटी पार्कमधील आयटी कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून कर्मचाऱ्यांना नियमित वेळेपेक्षा लवकर कंपनीतून सोडण्यात आले. ‘आयटीयन्स’ला सोमवारी कामावरून परतताना कसरत करावी लागली असल्याचे दिसून आले.मावळ व मुळशी तालुक्यात मूसळधार पाऊस होत असल्याने मुळशी आणि पवना धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी - चिंचवडसह उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस  बंद केले आहे. पिंपरी-चिंचवड व परिसरात सर्वत्र पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने आयटीपार्कमधील अनेक कंपन्यांनी सोमवारी सुटी जाहीर केली होती. काही कर्मचाºयांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना दिल्या होत्या. कामावर हजर असलेल्या ‘आयटीयन्स’ला पावसाचा जोर कायम असल्याने कंपनीतून लवकर सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आयटीपार्कमध्ये जाणारे  प्रमुख रस्ते काही ठिकाणी पाण्याखाली गेले आहेत. मुळा, मुठा, पवना नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने औंध, वाकड, चिंचवडसह अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून ‘आयटीयन्स’ना कंपनीतून लवकर सोडण्यात आले.मूसळधार पावसामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही कंपन्यांनी सुट्टी जाहीर केली होती. काहींना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना दिल्या होत्या. काही कारणास्तव हजर असलेल्या ‘आयटीयन्स’ना कामावरून लवकर सोडण्यात आले. - कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल, मुख्य कार्यकारी अधिकारी, हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशन काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस बंद केले आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. खबरदारीचा उपाय म्हणून कामावरून लवकर सोडण्याच्या सूचना केल्या आहेत.- संदीप देशमुख, अभियंता, हिंजवडी

टॅग्स :hinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानRainपाऊसfloodपूर