शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अन् निकालातही घडला इतिहास

By admin | Updated: February 24, 2017 02:26 IST

मंचर पंचायत समिती गणात इतिहास घडला आहे. शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले

मंचर : मंचर पंचायत समिती गणात इतिहास घडला आहे. शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले यांनी ४७३ मतांनी विजय संपादन करीत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत केले. तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रस व शिवसेना यांच्यात लढत रंगली असताना बाणखेले यांनी जोरदार मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली. राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या व शिवसेनेचा उमेदवार तब्बल तिसऱ्या स्थानावर राहिला. आंबेगाव तालुक्यात १९७२ मध्ये माजी खासदार किसनराव बाणखेले जिल्हा परिषदेला अपक्ष निवडून आले होते. पंचायत समितीला अपक्ष उमेदवार यापूर्वी कधीही निवडून आला नव्हता. मात्र या वेळी इतिहास घडला. अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेकडून विजयश्री अक्षरश: खेचून आणली. मंचरची अस्मिता व स्वाभिमान या दोन मुद्द्यांवर त्यांनी निवडणूक लढविली. फारसा जाहीर प्रचार न करता तसेच खर्च न करताही राजाराम बाणखेले यांनी मिळविलेले यश आज चर्चेचा विषय झाला आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यावर बाणखेले अपक्ष उभे राहिले. त्यांची शिवसेनतून हकालपट्टीसुद्धा झाली. मात्र बाणखेले यांच्यावर अन्याय झाल्याची भावना मंचरकरांमध्ये निर्माण झाली. त्यामुळेच त्यांना सर्वपक्षीय मतदान मिळाले आहे. त्यांच्या प्रचाराच्या सांगता सभेला झालेली गर्दी बरेच काही सांगून गेली. या सभेत बाणखेले यांनी भावनिक आवाहन केले. मंचर ही तालुक्याची राजकीय राजधानी आहे. येथील जागा मागच्या वेळी राष्ट्रवादीने जिंकली होती. या वेळी शिवसेना व राष्ट्रवादीने विजयासाठी प्रयत्न केले. मात्र मतदारांची सहानुभूती बाणखेले यांच्याकडे होती. मंचर शहरात फिरताना राजारामकडे लक्ष ठेवा, असे अगदी सहजपणे सर्वसामान्यांकडून बोलले जायचे. बाणखेले यांना गॅस सिलिंडर ही निशाणी मिळाली होती. आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रस व शिवसेना हे दोन पक्ष भक्कम स्थितीत असताना दोन दिग्गजांच्या बाणखेले यांनी मिळविलेला विजय सर्वत्र चर्चेचा झाला. हा विजय सर्वसामान्य माणसाचा आहे. अपक्ष उमेदवार असूनही जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. भविष्यात गोरगरीब जनतेचे काम मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. - राजाराम बाणखेले, विजयी अपक्ष उमेदवार