शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

मुंबई- पुणे महामार्गावरील 'ऐतिहासिक अमृतांजन' पूल होणार जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 16:06 IST

हा पूल अनेक अपघातांना ठरला होता कारण...

ठळक मुद्दे4 ते 14 एप्रिल या कालावधीत स्फोटकांच्या मदतीने हा पूल पाडण्यात येणार नेहमीच्या रहदारीचा, वाहतुकीचा रस्ता असल्याने तो पूल पाडणे होत नव्हते शक्य होत.

पुणे : मुंबई - पुणेमहामार्गावरील असणारा ब्रिटीशकालीन अमृतांजन पूल आता येत्या काही दिवसांत पाडण्यात येणार आहे. नेहमीच्या रहदारीचा, वाहतुकीचा रस्ता असल्याने तो पूल पाडणे शक्य होत नव्हते. मात्र सध्याच्या  लॉकडाऊनच्या काळात तो पाडण्यात येणार आहे. अशी माहिती ठाणे परिक्षेत्राचे महामार्ग पोलीस अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.     काळाच्या ओघात अमृतांजन पूल अधिक जीर्ण झाला असून तो अनेक दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाखालून द्रुतगती महामार्गावर वळण घेण्यासाठी अरुंद रस्ता आहे. यामुळे मोठया प्रमाणावर अपघात झाले आहेत. या कारणामुळे हा पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असून त्यानुसार त्यांनी 31 मार्च रोजी आदेश काढला आहे. त्यात हा पूल पाडण्याची परवानगी रस्ते विकास महामंडळाला देण्यात आली आहे.यामुळे 4 ते 14 एप्रिल या कालावधीत स्फोटकांच्या मदतीने हा पूल पाडण्यात येणार आहे.  असा उल्लेख अधीक्षक यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात करण्यात आला आहे. तसेच 4 ते 14 एप्रिल या काळात मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या पुणे लेनवरील वाहतूक अंडा पॉईंट वरून जुन्या महामार्गावरून खंडाळा लोणावळा शहरातून द्रुतगती महामार्गावर येईल. आणि मुंबई मार्गावरील वाहतूक लोणावळा येथून बाहेर पडून जुन्या मुंबइ पुणे महामार्गावरून लोणावळा खंडाळा शहरातून अंडा पॉईंट पर्यत वळविण्यात येणार आहे. अशाप्रकारे द्रुतगती मार्गावर एकूण 10 किमी अंतरासाठी पयार्यी मार्गांने वाहतुक वळविण्यात येणार असल्याचे महामार्ग पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेlonavalaलोणावळाhighwayमहामार्ग