पत्नीचा राग आल्याने तिच्या दुचाकीची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:08 IST2021-06-11T04:08:09+5:302021-06-11T04:08:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीबरोबर झालेल्या जुन्या भांडणातून पतीने पत्नीचा राग तिच्या दुचाकीवर काढला असून, दगडाने गाडीची तोडफोड ...

His wife got angry and vandalized her bike | पत्नीचा राग आल्याने तिच्या दुचाकीची तोडफोड

पत्नीचा राग आल्याने तिच्या दुचाकीची तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पत्नीबरोबर झालेल्या जुन्या भांडणातून पतीने पत्नीचा राग तिच्या दुचाकीवर काढला असून, दगडाने गाडीची तोडफोड केली. तसेच पत्नीसह मेव्हणी व सासूला मारहाण केली.

याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी ३० वर्षांच्या पतीला अटक केली आहे. याबाबत एका २३ वर्षांच्या महिलेने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व आरोपी हे दोघेही पती-पत्नी आहेत. ते धनकवडीतील संभाजीनगर येथे राहतात. मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडणे झाली होती. फिर्यादी या आईकडे गेल्या होत्या. त्यांचा पती ९ जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता तेथे आला. त्याने पत्नीची दुचाकी घेऊन रस्त्याच्या मध्यभागी लावली. गाडीचे पुढील मडगार्ड व पत्रा, पुढील, मागील हेडलाईट दगडाने फोडले. गाडीचे १० हजार रुपयांचे नुकसान केले. आवाज ऐकून फिर्यादी बाहेर आल्यावर आरोपी पतीने त्यांच्या डोक्यात दगड मारला. हाताने मारहाण केली. त्यांना सोडविण्यासाठी फिर्यादीची आई व बहीण आल्या असताना त्यांनाही त्याने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादींनी पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

Web Title: His wife got angry and vandalized her bike