शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

मराठी भाषेच्या कायद्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 19:49 IST

इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही मराठी भाषा सक्तीचा कायदा केल्यास मातृभाषेचे जतन होईल. 

ठळक मुद्देबालकुमार संस्थेतर्फे ‘बालभारती’समोर आंदोलनशिष्टमंडळ घेणार शिक्षण मंत्र्यांची भेट

पुणे : सर्व अमराठी शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबतच शासनाने अध्यादेश काढला आहे. मात्र, या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेने बालभारती कार्यालया समोर सोमवारी (दि. १७) आंदोलन केले. आंदोलनानंतर बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांना संस्थेतर्फे निवेदन देण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे, उपाध्यक्ष माधव राजगुरू, सहकार्यवाह सुनील महाजन, ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे, शिक्षण तज्ञ डॉ. न.म. जोशी, आश्लेषा महाजन, कविता मेहेंदळे, डॉ. दिलीप गरूड, ज्योतिराव कदम, विद्या साताळकर, गिरीजा शिंदे, दिपाली शेळके, निकीता मोघे, महेश सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते. राज्यातील मराठी शाळा बंद करू नका, मराठी शाळांचे सक्षमीकरण करा, अमराठी शाळांमध्ये पहिली ते बारावी मराठी सक्तीचा कायदा करा, असे फलक घेवून संस्थेचे पदाधिकारी, बालसाहित्यिक आणि शिक्षण तज्ञ आंदोलनात सहभागी झाले होते. डॉ. न. म.जोशी म्हणाले, या राज्याची मातृभाषाच मराठी आहे. मातृभाषेचे जतन करण्याची जबाबदारी मराठी भाषिकांसह राज्य शासनाचीही आहे. त्यामुळे मराठी भाषेची सक्ती झालीच पाहिजे. राजीव तांबे म्हणाले, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढत आहे. मराठी शाळेचा पट घटत आहे. त्यात सुधारणा झाली नाही, तर मराठी शाळा बंद पडण्यास विलंब लागणार नाही. त्यामुळे शिक्षणात मराठी भाषा अनिवार्य केल्यास मातृभाषेला तसेच मराठी शाळांना धोका निर्माण होणार नाही.      डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, सद्य:स्थितीत शासन पातळीवर मराठी भाषेविषयी अनास्था आहे. मात्र मातृभाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही मराठी भाषा सक्तीचा कायदा केल्यास मातृभाषेचे जतन होईल.  माधव राजगुरू, कविता मेहेंदळे, ज्योतिराव कदम, डॉ. दिलीप गरूड यांनी मनोगत व्यक्त केले. 

.....................

‘‘आमची मागणी मान्य न झाल्यास पुढच्या महिन्यात शहर आणि परिसरातील शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि बाल साहित्यिकांचे मोठे आंदोलन उभारण्यात येणार आहे. नव्या शिक्षण मंत्र्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मराठी भाषेचा कायदा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची भेट घेवून त्यांना लवकरच निवेदन देणार आहोत.’’ - सुनील महाजन, सहकार्यवाह, अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था.

टॅग्स :PuneपुणेmarathiमराठीGovernmentसरकारEducationशिक्षण