हिंजवडी-शिवाजीनगर : मेट्रोचा मार्ग बदलण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:39 AM2018-06-12T03:39:50+5:302018-06-12T03:39:50+5:30

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा मार्ग अखेर बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा मार्ग बालेवाडी लक्ष्मीमाता मंदिर ते बालेवाडी फाटा असा करण्यात आला होता.

 Hinjewadi-Shivajinagar: A proposal to change the route of the metro | हिंजवडी-शिवाजीनगर : मेट्रोचा मार्ग बदलण्याचा प्रस्ताव

हिंजवडी-शिवाजीनगर : मेट्रोचा मार्ग बदलण्याचा प्रस्ताव

Next

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा मार्ग अखेर बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा मार्ग बालेवाडी लक्ष्मीमाता मंदिर ते बालेवाडी फाटा असा करण्यात आला होता. परंतु त्याठिकाणी २४ मी.चा रस्ता ३० मी. करून अनेक स्थानिक नागरिकांची घरे या प्रकल्पांतर्गत बाधित होत होती. त्यामुळे हा रस्ता बदलण्याचा प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.
हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटरच्या मेट्रोसाठी बालेवाडी लक्ष्मीमाता मंदिर ते बालेवाडी फाटा येथील स्थानिक रहिवासी यांची घरे बाधित होत आहे. त्यामुळे प्रामुख्याने हा मेट्रो मार्ग बलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
या परिसरातील भविष्यात वाहतुकीची समस्या ही गंभीर बनणार होती. याचीच दखल घेत स्थानिक नगरसेवकांनी हा मार्ग बदलण्यासाठी विनंती केली होती.
याचा विचार करून पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा मार्ग बालेवाडी हायस्ट्रीट ते गणराज चौक ३० मी. डीपी रोडने वळवण्यात आला. यामुळे येथील शेकडो नागरिकांची घरे वाचणार आहेत व भविष्यातल्या होणाऱ्या समस्याही टळणार आहेत.

Web Title:  Hinjewadi-Shivajinagar: A proposal to change the route of the metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.