हिंदुत्ववाद हा बंधुत्ववाद नव्हे : कुमार सप्तर्षी; कोथरूडमध्ये नागरी सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:51 PM2017-12-28T16:51:22+5:302017-12-28T16:55:30+5:30

मतदान मिळविण्याची कला हिंदुत्ववाद्यांकडे आहे. पण राजकीय धोरण आखण्याचे गुण त्यांच्यात नाहीत, असे मत युवक क्रांती दलाचे प्रमुख कुमार सप्तर्षी यांनी मांडले.

Hinduism is not brotherly spirit; Kumar Saptarshi; Kathrud Nagri Sabha | हिंदुत्ववाद हा बंधुत्ववाद नव्हे : कुमार सप्तर्षी; कोथरूडमध्ये नागरी सभा

हिंदुत्ववाद हा बंधुत्ववाद नव्हे : कुमार सप्तर्षी; कोथरूडमध्ये नागरी सभा

googlenewsNext
ठळक मुद्देयुवक क्रांती दल अणि महात्मा गांधी स्मारक निधीतर्फे नागरी सभामुस्लिम समाजात भाजपा बाबत जाणवली चीड : प्रवीण सप्तर्षी

पुणे : हिंदुत्ववाद हा बंधुत्ववाद होउ शकत नाही. हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवाद यात खुप गोंधळ असून त्याचा फायदा भाजपा घेते. मतदान मिळविण्याची कला हिंदुत्ववाद्यांकडे आहे. पण राजकीय धोरण आखण्याचे गुण त्यांच्यात नाहीत, असे मत युवक क्रांती दलाचे प्रमुख कुमार सप्तर्षी यांनी मांडले.
युवक क्रांती दल अणि महात्मा गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित नागरी सभेत ते बोलत होते. ‘गुजरात निवडणूक निकालाचे विश्लेषण अणि प्रचारात सहभागी  कार्यकर्त्यांचे अनुभव कथन’ हा या सभेचा विषय होता. कोथरुड येथील गांधी भवनमध्ये ही सभा झाली. डॉ. रमा सप्तर्षी, डॉ प्रवीण सप्तर्षी आदी यावेळी उपस्थित होते. कुमार सप्तर्षी म्हणाले, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकुर या दलित, ओबीसी, पटेल जातीतील नेतृत्वामध्ये एकी झाल्याने भाजपच्या राजनितीला तडा गेला.
प्रवीण सप्तर्षी म्हणाले, गुजरात निवडणूक दरम्यान फिरतांना शहरी लोक शेती प्रश्नांबाबत उदासीन दिसले. मुस्लिम समाजात भाजपा बाबत चीड जाणवली. भाजपाबद्दल व्यापारी वर्गात नाराजी होती पण तिचे रूपांतर मदातानात झाले नाही. जिग्नेश मेवाणीच्या प्रचारासाठी गेलेल्या सचिन पांडुळे यांनी आपले अनुभव कथन केले.
 

Web Title: Hinduism is not brotherly spirit; Kumar Saptarshi; Kathrud Nagri Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.