शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!
2
'बह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
3
सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष
4
राज्यात आता रोबोट करणार मॅनहोलची सफाई, २७ महापालिकांसाठी १०० रोबोट
5
"मी माझी फिल्म बघितली अन्.."; 'सुशीला सुजीत' सिनेमा पाहिल्यावर सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?
6
जगातील निम्मे सोने असूनही बुडाला देश; अर्थव्यवस्था रुळावर यायला लागले तब्बल १२ वर्षे
7
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला मिळतील १६,६५० रुपये
8
Video - धक्कादायक! चालता बोलता 'तो' खाली कोसळला, सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यूचा संशय
9
टाईम मॅगझीनच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत एकही भारतीय नाही, ट्रम्प-युनूस यांचा समावेश; असं आहे कारण
10
जगभर : युक्रेनच्या स्त्रिया शिवताहेत ‘किकिमोरा वॉरसूट्स’, युद्धातील संघर्ष कथा
11
IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी
12
बहुतेक लोकांना 'या' लोनबद्दल माहितीच नाही, Personal Loan पेक्षाही स्वस्त आणि EMI चं टेन्शनही नाही
13
बँड, बाजा आणि जेल! लग्न होताच अटक; ४ गुन्हेगारांना पकडण्यासाठी १५३ पोलिसांचा फौजफाटा
14
लेख: ‘रोजगार हमी’चा खर्च तिप्पट; मजुरांना पैसे मिळाले का?
15
भल्यामोठ्या अजगरासह बाथटबमध्ये आंघोळ करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
16
"मधुबाला शेवटी एकटी पडली, किशोर कुमार यांनी दुर्लक्ष केलं", बहीण मधुर भूषण यांचा खुलासा
17
बाबा रामदेव यांच्या पतंजलीची अदार पूनावाला यांच्या कंपनीसोबत मोठी डिल; नवीन क्षेत्रात उडी
18
रेणुका शहाणेंनी आशुतोष राणांसोबत कधीच काम का नाही केलं? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..."
19
गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर? इन्फ्लुएन्सरचा दावा; हॉटेलने केली अशी कमेंट
20
"तिच्या अंगाची दुर्गंधी येते"; प्रतिस्पर्ध्याला वापरण्यास सांगितले डीओ; टेनिसमधला अजब प्रकार

हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई जामिनावर सुटणार, ५ वर्षांनंतर जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 01:51 IST

अभियंता मोहसीन शेख खून प्रकरणात अटकेत असलेला हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई तब्बल पाच वर्षांनी शनिवारी जामिनावर सुटणार आहे.

पुणे : अभियंता मोहसीन शेख खून प्रकरणात अटकेत असलेला हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई तब्बल पाच वर्षांनी शनिवारी जामिनावर सुटणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातलेल्या अटींच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्याची सुटका होईल, असे अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी सांगितले.हडपसर येथे उसळलेल्या दंगलीत अभियंता मोहसीन शेख याचा खून झाला होता. त्या प्रकरणी देसाई याला जून २०१४मध्ये अटक करण्यात आली होती. देसाई याच्या वतीने जामिनासाठी अ‍ॅड. अभिजित देसाई व अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून युक्तिवाद केला होता. महापुरुषांची फेसबुकवर बदनामी झाल्यानंतर तरुण उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. कोणाच्या खुनाचा कट केला नव्हता किंवा कोणाच्याही खुनाचा उद्देश नव्हता; फक्त आंदोलन सुरू असताना दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली व अचानक मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरू झाली व त्यामधे दगड लागून मोहसीन शेख याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तर, सरकार पक्षाचे म्हणणे होते, की या आरोपींनी जातीय दंगल घडवून शेख याचा खून केला आहे. बेकायदा जमाव जमवून मालमत्तेचे नुकसान केले आहे. तसेच मुस्लिम समाजाच्या विरोधात प्रचार केला व पत्रके वाटली, मुस्लिम समाजाचा बदला घेण्यासाठी चिथावणी दिली, मुस्लिम समाजाच्या व्यक्तीचा खून केला. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलका देऊन देसाईचा जामीनमंजूर केला.भाषणांना बंदीआरोपी देसाईने खटला संपेपर्यंत हिंदू राष्ट्र सेनेचे काम करू नये, खटल्याशी संबंधित साक्षीपुराव्याशी छेडछाड करू नये, खटल्याशी संबंधित साक्षीदारांवर दबाव आणू नये, सुनावणी होईपर्यंत जाहीर भाषणे करू नयेत, असे प्रतिज्ञापत्र देसाईने उच्च न्यायालयात दाखल करावे,असे आदेश देत जामीन मंजूर केला आहे.अटींबाबतच्या प्रतिज्ञापत्रावर सही घेण्यासाठी प्रतिज्ञापत्र कारागृहात दाखल केलेआहे. त्यावर सही झालीआहे, असे अ‍ॅड. पवार यांनीसांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणे