शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

हिंदी भाषा सक्ती:‘खळ खट्याक’सह मनसेचे ‘बौद्धिक’ विरोधाचेही मोर्चे;गुगल फॉर्ममधून जमा केले जातेय जनमत

By राजू इनामदार | Updated: June 27, 2025 14:47 IST

मनसेच्या सोशल मीडिया टीमने एक गुगल फॉर्म तयार केला असून, तो नागरिकांकडून ऑनलाइन भरून घेतला जात आहे. याशिवाय बालमानसोपचार तज्ज्ञ, भाषा तज्ज्ञ यांचे बाईटस् तयार केले जात असून, ते व्हायरल केले जात आहेत.

पुणे : खळ-खट्याकसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात बौद्धिक विरोधाचीही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मनसेच्या सोशल मीडिया टीमने एक गुगल फॉर्म तयार केला असून, तो नागरिकांकडून ऑनलाइन भरून घेतला जात आहे. याशिवाय बालमानसोपचार तज्ज्ञ, भाषा तज्ज्ञ यांचे बाईटस् तयार केले जात असून, ते व्हायरल केले जात आहेत.

विरोधातील मनसेचे कोणतेही आंदोलन खळ-खट्याकशिवाय पूर्ण होत नाही. काहीतरी तोडफोड हे मनसेच्या आंदोलनाचे वैशिष्ट्य झाले आहे. इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातही मनसेचे फायर ब्रँड अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोण कशी सक्ती करतो ते पाहतोच अशी गर्जना केली आहे. त्याशिवाय ६ जुलैला एका जाहीर मोर्चाचीही हाक त्यांनी दिली आहे. मात्र, हे करतानाच मनसेच्या सोशल टीमलाही राज यांनी सक्रिय केले आहे.

या टीमने एक गुगल फॉर्म तयार केला आहे. पक्षीय शिक्का पूर्णपणे बाजूला ठेवलेला असा हा फॉर्म आहे. तो ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहे. टीमने तो वेगवेगळ्या ग्रुप्सपवर अपलोड केला आहेच, शिवाय संस्था, संघटना व स्वतंत्रपणे तो मिळेल अशीही व्यवस्था ऑनलाइनच केली आहे. नाव, पत्ता, वयोगट, व्यवसाय, पालक आहात की अविवाहित अशा आवश्यक माहिती फॉर्ममध्ये आहेच. त्याचबरोबर, हिंदी भाषा सक्तीविषयी काय वाटते? यातून मराठी भाषेला धोका वाटतो का? एखाद्या भाषेची अशी सक्ती असावी का? इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना एकदम ३ भाषा शिकवाव्यात का? भाषेची तीसुद्धा हिंदी भाषेची सक्ती करण्यामागे काही राजकीय षडयंत्र आहे असे वाटते का? अशा एक प्रश्नावली या फॉर्ममध्ये आहे.

हा फॉर्म भरून तो ऑनलाइनच सबमीट करायचा आहे. मनसेच्या टीमने एक स्वतंत्र हँडलर नियुक्त केला आहे. त्याच्याकडून हे फॉर्म जमा केला जात आहेत. बुधवारी हे फॉर्म ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले. एकाच दिवसात तब्बल ५० हजार फॉर्म जमा झाले असल्याची माहिती या टीमकडून देण्यात आली. जास्तीत जास्त संख्येने फॉर्म जमा व्हावेत यासाठी काहीही न करता इतके फॉर्म जमा झाले असल्याचे सांगण्यात आले. ६ जुलैच्या आंदोलनापर्यंत हे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत.

त्याशिवाय बालमानस अभ्यासक डॉ. श्रुती पानसे, मेधा शिदोरे यांच्याबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व अन्य अनेक मान्यवरांचे या सक्तीविषयीची, मुलांना अशा तीनतीन भाषा शिकवाव्यात का? याविषयीची मतांचे व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. ते समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात येत आहेत. यातून हा विषय जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा असा उद्देश असल्याचे टीमकडून सांगण्यात आले. याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देण्यात आली.

हा विषय मनसेचा असला तरी आमचे नेते राज ठाकरे यांच्या आवाहनानुसार हा समस्त मराठीजनांचा विषय आहे. राज यांच्याच आदेशाने आमची टीम हा विषय पक्षमुक्त करून काम करत आहे. मराठी भाषेसाठी मनसेनेच वारंवार आवाज उठवला असून, हाही त्याचाच एक भाग आहे. पक्षीय विचार न करता मराठी माणसाने या सक्तीचा विरोध करावा अशी आमची भूमिका आहे.

-संतोष पाटील, मनसे सोशल मीडिया टीम, राज्य पदाधिकारी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMNSमनसे