वाडा परिसरातील डोंगरांनी पेट घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST2021-03-04T04:18:28+5:302021-03-04T04:18:28+5:30

वाडा परिसरातील सुरकुंडी व चिखलगावजवळील डोंगरांनी पेट घेतला आहे. या रणरणत्या उन्हात सह्याद्रीच्या कडेकपारीतील डोंगरावर आगीचे दृश्य दिसत आहे. ...

The hills around the castle took a beating | वाडा परिसरातील डोंगरांनी पेट घेतला

वाडा परिसरातील डोंगरांनी पेट घेतला

वाडा परिसरातील सुरकुंडी व चिखलगावजवळील डोंगरांनी पेट घेतला आहे. या रणरणत्या उन्हात सह्याद्रीच्या कडेकपारीतील डोंगरावर आगीचे दृश्य दिसत आहे. डोंगर उतारावर असणारी झाडे आगीत नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.सरकुंडी ते देवोशी या रस्त्याने प्रवास करताना डोंगरांना आग लागून डोंगर काळेकुट्ट झालेले दृष्टीस पडतात. कोणीही आग विझवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. जमिनीखाली असणारे साप, घोरपड,ससे,सरडे इत्यादी प्राणी आगीत होरपळून मरत आहेत. येथील प्राणी व पक्षी स्थलांतर करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जैवविविधेचा नाश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून जनावरांचा चारा, औषधी वनस्पती या आगीत नष्ट होत आहेत. पश्चिम पट्ट्यातील डोंगर उघडे पडू लागले आहेत. झाडे कमी झाल्याने वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट होत आहेत.त्यामुळेच वन्यप्राणी अन्नाच्या शोधत भरवस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत. डोंगरांना लागलेली आग कशामुळे लागली, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: The hills around the castle took a beating