अपहरणकर्ते जाळ्यात
By Admin | Updated: January 11, 2017 03:19 IST2017-01-11T03:19:00+5:302017-01-11T03:19:00+5:30
रिअल इस्टेट एजन्सीच्या संचालकाचे अपहरण करणाऱ्या तिघांना देहूरोड पोलिसांनी आष्टी (बीड) येथून अटक केली. रवींद्र दशरथ जगताप

अपहरणकर्ते जाळ्यात
देहूरोड : रिअल इस्टेट एजन्सीच्या संचालकाचे अपहरण करणाऱ्या तिघांना देहूरोड पोलिसांनी आष्टी (बीड) येथून अटक केली. रवींद्र दशरथ जगताप (वय ३२, रा. नवलवाडी जामगाव, ता आष्टी, जिल्हा बीड ), अशोक दिलीप राऊत (वय २६, रा. पारगाव, बीड), सचिन रोहिदास तांगडे (वय २७, रा. जामगाव, बीड) अशी आरोपींची नावे आहेत.
सुरेश बाबूराव जाधव (वय ४१, रा. काशीकुंज,आदर्श कॉंलनी, किवळे) हे डांगे चौक, चिंचवड येथील रिअल इस्टेट एजन्सीचे संचालक आहेत. (वार्ताहर)
असे झाले अपहरण
४दोन वर्षांपूर्वी आरोपींनी २६ लाख रुपयांची सदनिका तुळजापूर येथे बुक केली होती. त्यानंतर सहा महिन्यांत व्यवहार रद्द करीत त्यांनी रक्कम परत मागितली. वारंवार लेखी अर्ज दिले. तसेच पाच ते सहा जणांसह दमदाटी शिवीगाळ केली. मात्र, जाधव त्यांना रक्कम परत करू शकले नाहीत. शुक्रवारी, ६ जानेवारीला सकाळी साडेनऊच्या सुमारास मोटारीतून (एमएच २३ एडी ३८४५) आलेल्या तीन आरोपींनी सुरेश जाधव यांचे अपहरण केले, अशी फिर्याद भानुदास बाबूराव जाधव यांनी दिली आहे .