अपहृत व्यावसायिकाची सुटका
By Admin | Updated: June 12, 2017 01:42 IST2017-06-12T01:42:54+5:302017-06-12T01:42:54+5:30
जमिनीची कागदपत्रे दाखवण्याच्या बहाण्याने नदीपात्रामध्ये बोलावून घेतलेल्या बांधकाम व्यावसायिकाकडे पिस्तुलाच्या धाकाने पाच कोटींची खंडणी मागण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली

अपहृत व्यावसायिकाची सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जमिनीची कागदपत्रे दाखवण्याच्या बहाण्याने नदीपात्रामध्ये बोलावून घेतलेल्या बांधकाम व्यावसायिकाकडे पिस्तुलाच्या धाकाने पाच कोटींची खंडणी मागण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. मोटारीमधून जात असताना स्वत:ची सुटका करुन पलायन केल्यामुळे बांधकाम व्यावसायिक बचावला. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
महेंद्र शांताराम बोडके (वय २८, रा. धनकवडी) व कार्तिक कानोरे (वय २५, रा. साईनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या आणखी तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी दिघी परिसरात राहणाऱ्या ४२ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी परिसरात राहणारी आरोपी महिला आणि बांधकाम व्यावसायिक एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते एकमेकांना अधूनमधून भेटत होते. त्यांच्यामध्ये वाद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भेटी कमी झाल्या होत्या. ही महिला आणि आरोपी बोडके यांची दरम्यानच्या काळात ओळख झाली. बोडकेची मदत घेऊन फिर्यादीच्या अपहरणाचा कट रचण्यात आला.
घाबरलेल्या फिर्यादी यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी बोडकेला अटक केली आहे. पुढील तपास निरीक्षक अरुण आव्हाड हे करत आहेत.