शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी करणाऱ्या बापाची उच्चशिक्षित पोरगी निघाली अमेरीकेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 19:43 IST

जिद्द असेल, तर सामान्य कुटुंबातील मुलेही किती पुढे जाऊ शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे

बारामती - बारामतीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी (दि. २०) पत्रकारांनी पवार यांना ‘एआय’ तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या संभाव्य फायद्यांबाबत विचारणा केली. यावेळी पवार यांनी ‘एआय’मध्ये उच्च शिक्षणासाठी थेट अमेरिकेला निघालेल्या माळेगावच्या मुलीची ओळख पत्रकारांशी करून देत तिच्या कर्तृत्वाचे कौतुक केले.

यावेळी पवार म्हणाले, “एआयमुळे शेतीसमोरील विविध आव्हानांवर मात करणे शक्य होईल. येथील मुला-मुलींना याचे ज्ञान मिळावे, यासाठी एआय शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. माळेगावच्या या मुलीने ही संधी साधत थेट अमेरिकेच्या दिशेने झेप घेतली आहे. तिचे वडील रोजंदारीवर काम करतात, तरीही जिद्द आणि अभ्यासाच्या बळावर तिने अमेरिकेतील विद्यापीठात एआयच्या मास्टर्ससाठी प्रवेश मिळवला आहे. जिद्द असेल, तर सामान्य कुटुंबातील मुलेही किती पुढे जाऊ शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे. या मुलीचे शिक्षण शारदानगर व विद्या प्रतिष्ठानमध्ये झाले आहे, आणि या दोन्ही संस्था आपण उभ्या केल्याचेही पवारांनी यावेळी नमूद केले.

दरम्यान, या मुलीचे नाव आल्फीया जावेद तांबोळी आहे. तिने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “शारदानगर येथे १ ली ते १२ वी पर्यंत माझे शिक्षण झाले. ‘साहेब’ माझ्या आजोबांचे वर्गमित्र असल्याने आमच्या कुटुंबाची त्यांच्याशी चांगली ओळख आहे. शिक्षणात मी सातत्याने ‘टॉप’मध्ये असल्यामुळे ‘साहेबां’मुळे मला ८ वी ते १२ वी दरम्यान शिष्यवृत्ती मिळाली.

१२ वीला ‘टॉप थ्री’मध्ये आले म्हणून एआय इंजिनिअरिंगला विद्या प्रतिष्ठानमध्ये प्रवेश घेण्याच्या वेळी अजितदादांनी मदत केली. माझे वडील रोजंदारीवर कामाला जातात, तर आई शिवणकाम आणि पार्लर चालवते. मला एक भाऊ व एक बहीण आहे. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या प्रक्रियेत ‘साहेबां’नी दिलेली मदत माझ्यासाठी अत्यंत मोलाची ठरली. अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली एआयवर संशोधन करण्याची माझी इच्छा आहे,” असे तिने सांगितले.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रSharad Pawarशरद पवारBaramatiबारामती