शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

अतिदूर्गम भागातील घरे उजळली लख्ख प्रकाशाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 7:33 PM

केवळ चांदण्यांच्या टिपूर प्रकाशात राहण्याची सवय असणा-या येथील नागरिकांची घरे लख्ख प्रकाशाने उजळून निघाली.

ठळक मुद्देसलग सात दिवसांच्या अविश्रांत कामानंतर येथील घरात प्रकाश सुमारे १३०० मीटर डोंगरदरीत असलेल्या चांदर गावासाठी डोंगर उतारावर एकूण १७ वीजखांबएका विद्यार्थ्याला अध्यापन करण्यासाठी जाणारे रजनीकांत मेंढे यांच्यामुळे चांदर गाव प्रकाशात

पुणे: जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्या अतिदुर्गम भागातील चांदर या गावासह दोन वस्त्यांमध्ये महावितरणने अवघ्या सात दिवसांत ६५ वीजखांब व एका वितरण रोहित्राने वीजयंत्रणा उभी केली.त्यामुळे केवळ चांदण्यांच्या टिपूर प्रकाशात राहण्याची सवय असणा-या येथील नागरिकांची घरे लख्ख प्रकाशाने उजळून निघाली.

 पुणे व रायगड जिल्ह्याच्या सिमेलगत सह्याद्रीच्या घनदाट वनराईत दोन डोंगराच्या खोल दरीत केवळ १८ घरांचे चांदर हे गाव वसलेले आहे.तसेच बाजूच्याच डोंगरमाथ्यावर १० घरांची टाकेवस्ती व दुस-या डोंगरमाथ्यावर १८ घरांची डिगेवस्ती असा ४६ घरांचा परिसर आहे. चांदर पुण्यापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असून पावसाळ्यात सुमारे ५ ते ६ महिने चांदर व लगतच्या दोन्ही वस्त्यांचा जगाशी संपर्क तुटलेला असतो. परंतु, डोंगरद-यातील याच गावात महावितरणने सामाजिक बांधिलकीचे एक नवीन प्रकाशपर्व सुरु केले आहे.  महावितरणचे सुमारे ६० कर्मचारी चांदर परिसरातील डोंगरद-यात वीजयंत्रणा उभारण्यासाठी सकाळी ९ ते रात्री उशिरापर्यंत राबत होते. अत्यंत खडतर रस्त्याने सर्वप्रथम वीजखांब, तारा व इतर तांत्रिक साहित्य एकाच दिवसात आणल्यानंतर प्रत्यक्ष वीजयंत्रणा उभारण्याचे काम सुरु झाले. सलग सात दिवसांच्या अविश्रांत कामानंतर महावितरणने डोंगरद-यातून खेचून आणलेला येथील घरात प्रकाश पोहचला. त्यासाठी सुमारे १३०० मीटर डोंगरदरीत असलेल्या चांदर गावासाठी डोंगर उतारावर एकूण १७ वीजखांब उभारावे लागले. ही वीजयंत्रणा उभारण्यासाठी महावितरणला सुमारे २० लाख रुपये खर्च आला. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चांदर गाव व दोन वस्त्यांमध्ये प्रत्येकी दोन नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. डोंगर द-यातून अडीच- तीन तास प्रवास करून चांदर येथील शाळेत केवळ एका विद्यार्थ्याला अध्यापन करण्यासाठी जाणारे रजनीकांत मेंढे यांच्यामुळे अतिदुर्गम भागातील चांदर गाव ख-या अर्थाने समोर आले.या शाळेला महावितरणकडून नवीन वीजजोडणी देण्यात आलेली आहे.

टॅग्स :PuneपुणेRaigadरायगडmahavitaranमहावितरण