शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

आगीच्या सर्वाधिक घटना '' शॉर्टसर्किट'' मुळेच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 7:00 AM

शहरात सर्वाधिक आगीच्या घटना हा शॉर्ट सर्किटमुळे अथवा गॅस गळतीमुळे होत असल्याचे दिसून आले आहे़

ठळक मुद्देप्रशांत रणपिसे : सदोष वायरिंगचा परिणाम

विवेक भुसेपुणे : शहरात दररोज ८ ते १० आगीच्या घटना घडत असतात़. त्यात शॉर्टसर्किट व गॅस गळतीचे निम्मे निम्मे प्रमाण आहे़. एकदा घर अथवा दुकान घेतल्यानंतर आपण अनेक वर्षे घरातील वायरिंगकडे लक्ष देत नाही़. मात्र घर, दुकानातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दरवर्षी वाढत जातात़. त्यातून आगीच्या घटना घडतात़ एकूण आगीच्या घटनांमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याच्या घटना निम्म्या असतात, असे अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले़. उरळी देवाची येथे गुुरुवारी राजयोग साडी डेपोला लागलेल्या आगीत ५ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला़. शहरात दररोज आगीच्या घटना घडत असतात़. त्यात प्रामुख्याने दुकानात, घरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीचे प्रमाण मोठे आहे़. पुण्यात गेल्या वर्षभरात तब्बल ३ हजार १७९ आगीच्या घटना घडल्या़ त्यात सर्वाधिक १हजार ७८५ घटना या घरांमध्ये अथवा दुकानांमध्ये लागलेल्या आगीच्या होत्या़.    या आगीच्या घटनांबाबत प्रशांत रणपिसे यांनी सांगितले की, शहरात सर्वाधिक आगीच्या घटना हा शॉर्ट सर्किटमुळे अथवा गॅस गळतीमुळे होत असल्याचे दिसून आले आहे़. त्यात अनेक आगीच्या घटनांमध्ये आग कशी लागली. हे पाहण्यासाठी कोणी नसते़ अथवा बंद घराला, दुकानाला आग लागून त्यात सर्व काही जळून खाक होते़. त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकत नाही़ अशा अनेक घटना असतात़. घरात अथवा दुकानात कन्सिल वायरिंग केलेली असते़. त्यामुळे या वायरींची स्थिती काही वर्षांनी कशी आहे़ हे समजू शकत नाही़. घरात अथवा दुकानात दरवर्षी नव्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंची भर पडते़. त्याचा परिणाम या वायरिंगवर काही होतो, त्या वायरिंगचा विजेचा दाब सहन करण्याची क्षमता किती, आपण त्यावर किती विजेचा दाब टाकत आहोत, या कधीही दुकानदार, घरातील व्यक्ती विचार करीत नाहीत़. तसेच त्यामुळे ओव्हरलोड झाल्यावर या वायरींचे क्षमता कमी होते़. त्यात आतल्या आत जळून जाण्याची शक्यता वाढते़ तसेच रात्री अपरात्री अचानक विजेचा दाब वाढण्याची शक्यता असते़. त्यातून वायरिंग जळून शॉर्ट सर्किट होतो व आग लागून होत्याचे नव्हते होते़. त्यामुळे काही वर्षांनी घरातील तसेच दुकानातील वायरिंग व्यवस्थित आहे का़, वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणांना लागणारी विजेचा दाब या वायरी सहन करु शकतात का, याची तपासणी करणे गरजेचे आहे़ 

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल