शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील रेल्वेत सर्वाधिक गुन्हे!; एनसीआरबीचा अहवाल, उत्तर प्रदेश १५व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 16:05 IST

रेल्वेगाड्या, स्थानके तसेच परिसरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. मागील वर्षभरात राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) महाराष्ट्रात तब्बल २ लाख ३१ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे.

ठळक मुद्देमागील वर्षभरात महाराष्ट्रात तब्बल २ लाख ३१ हजार गुन्ह्यांची नोंदगुन्ह्यांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत उत्तर प्रदेशात पंधराव्या स्थानावर

पुणे : रेल्वेगाड्या, स्थानके तसेच परिसरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. मागील वर्षभरात राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) महाराष्ट्रात तब्बल २ लाख ३१ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण २० टक्के आहे. दरवर्षी या गुन्ह्यांमध्ये वाढच होत असून त्यात चोरीच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) रेल्वेशी संबंधित गुन्ह्यांची माहिती वार्षिक अहवालात दिली आहे. त्यानुसार मागील वर्षभरात आरपीएफ आणि जीआरपीने संपूर्ण देशभरात सुमारे ११ लाख ३० हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यामध्ये आरपीएफने नोंदविलेल्या गुन्हे सर्वाधिक १० लाख ६९ हजार एवढे आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे १ लाखाने वाढले आहे. राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे घडत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. राज्यात आरपीएफने नोंदविलेले गुन्हे २ लाख २३ हजार ३६० आहे. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असले तरी महाराष्ट्राच्या तुलनेत गुन्ह्यांचे प्रमाण तब्बल एक लाखाने कमी आहे. दर एक लाख लोकसंख्येच्यामागे राज्यातील रेल्वेत १८५ दखलपात्र गुन्हे दाखल होतात. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण २१ टक्के आहे. या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. तर लोकसंख्येच्या तुलनेत उत्तर प्रदेशात पंधराव्या स्थानावर आहे. जीआरपीने २०१६ मध्ये महाराष्ट्रात ७ हजार ६८४ गुन्हे दाखल केले होते. याबाबतीत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक गुन्हे दाखल असले तरी लोकसंख्येच्या तुलनेत गुन्हांचा विचार केल्यास उत्तर प्रदेश पाचव्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. जीआरपी तसेच आरपीएफने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणात दरवर्षी वाढ होत चालली आहे. राज्यात तुलनेने रेल्वेचे जाळे कमी असले तरी घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण मात्र चिंतेची बाब ठरत आहे.

‘आरपीएफ’ने नोंदविलेले गुन्हे : राज्य                          २०१५              २०१६             (एक लाख लोकसंख्येमागे)                                                                               दखलपात्र गुन्ह्यांचे प्रमाणे१. महाराष्ट्र                १९६६०२         २२३३६०           १८५.३२. उत्तर प्रदेश            १०६५७७        १२४७२०            ५६.९३. मध्य प्रदेश             ८८२२६          ९८९६४              १२६.५४. तामिळनाडू            ७९८५३           ८१६३९             ११७.४५. गुजरात                  ७०८७७          ७७२३०              १२२.४६. आंध्र प्रदेश             ५१०७६           ६९६८९             १३४.७

‘जीआरपी’ने नोंदविलेले गुन्हे :राज्य                       २०१५        २०१६         (एक लाख लोकसंख्येमागे)                                                                        दखलपात्र गुन्ह्यांचे प्रमाण१. उत्तर प्रदेश         ७१६८           १०९१८              ३.८ २. महाराष्ट्र             ७५५६           ७६८४                ६.१३. केरळ                  ६०४६           ७६७८                ०.९४. गुजरात              ६८०४           ६५६१                २.४५. मध्य प्रदेश         ४६४९           ५२५३                ६.५

चोरीचे प्रमाण अधिकरेल्वेमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. जीआरपीने दाखल केलेल्या २०१६ मधील गुन्ह्यांमध्ये ६ हजार ५५१ गुन्हे चोरीचे होते. तसेच जबरी चोरीच्या २०५ घटना घडल्या आहेत. देशात जबरी चोरीच्या सर्वाधिक घटना उत्तर प्रदेशात ३८१ समोर आल्या आहेत. दरोड्याचे प्रमाण मात्र महाराष्ट्रातच जास्त आहे. २०१६ मध्ये देशात रेल्वेध्ये दरोड्याच्या ५३ घडल्या होत्या. त्यापैकी सर्वाधिक १३ घटना महाराष्ट्रातील आहेत. तसेच फसवणुक, मारहाण, सार्वजनिक सुरक्षितता, अनधिकृत विक्रेते, रेल्वे मालमत्ता अशा विविध घटनांशीसंबंधित गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीUttar Pradeshउत्तर प्रदेशMaharashtraमहाराष्ट्र