मॉकड्रीलमध्ये जीआरपी नापास

By admin | Published: April 5, 2015 12:03 AM2015-04-05T00:03:30+5:302015-04-05T00:03:30+5:30

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घणसोली रेल्वे स्थानकात आपत्ती व्यवस्थापनाच्या चाचणीकरिता मॉकड्रील घेण्यात आले.

GRP notices in Mokkrial | मॉकड्रीलमध्ये जीआरपी नापास

मॉकड्रीलमध्ये जीआरपी नापास

Next

नवी मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घणसोली रेल्वे स्थानकात आपत्ती व्यवस्थापनाच्या चाचणीकरिता मॉकड्रील घेण्यात आले. यावेळी सर्वच यंत्रणा घटनास्थळी दाखल झालेल्या असताना रेल्वे पोलीसच तब्बल एक तास उशिरा आले.
शहरात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली असून अनेक राजकीय बदलांमुळे तणावाचे प्रसंगही येत आहेत. अशा वेळी समाजकंटकांकडून घातपात घडवण्याचीही दाट शक्यता आहे. अशा प्रसंगी आपत्कालीन यंत्रणा सक्षम आहे का याची चाचपणी शनिवारी घणसोली रेल्वे स्थानक येथे घेण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने तेथे मॉकड्रील घेण्यात आले. स्थानकाबाहेर पूर्वेकडील बाजूला एक बॉक्स असून त्यामध्ये बॉम्ब असल्याची शक्यता वर्तवणारे फोन सर्वच यंत्रणेला गेले. त्यानुसार पालिका अधिकाऱ्यांसह ऐरोली व वाशीचे अग्निशमन दल, कोपरखैरणे- रबाळे एमआयडीसी पोलीस यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. दुपारी ३.४० वाजता आपत्कालीन यंत्रणेचीही परीक्षा झाली. काही क्षणात बघ्यांची गर्दीही तेथे वाढू लागली. सुमारे २० मिनिटांनी नवी मुंबई पोलिसांचे बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडील श्वान व अद्ययावत स्कॅनरचा वापर करून या बॉक्समध्ये बॉम्बसदृश काही नसल्याची पुष्टी केली. त्यानंतर हे मॉकड्रील संपल्याचे घोषित होत असतानाच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावरून रेल्वे स्थानकातच झालेल्या या मॉकड्रीलच्या परीक्षेत रेल्वे पोलीस नापास ठरल्याचे दिसून आले. रेल्वेस्थानकाच्या इमारतीमध्येच सुमारे एक तास हा प्रकार सुरू असतानाही स्थानकामधील एकही रेल्वे पोलीस तिकडे फिरकला नाही. बोर्डाचे सुरक्षा रक्षक तर घटनास्थळापासून काही अंतरावर बघ्याच्या भूमिकेत होते. त्यापैकीही एकाने जमावाला पांगवण्याचे अथवा परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी पोलीस यंत्रणेला सहकार्यासाठीही पुढाकार घेतला नाही. सुरक्षेचे गांभीर्य अद्यापही दिसून येत नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले. घणसोली स्थानकातील रेल्वे पोलिसांनी स्थानकाबाहेरील घटनेचे गांभीर्य ओळखून ते वाशी रेल्वे पोलीस ठाण्यातील वरिष्ठांपर्यंत कळवणे आवश्यक होते. मात्र त्यांनीच पाठ फिरवली. (प्रतिनिधी)

Web Title: GRP notices in Mokkrial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.