कोरेगाव पार्कमधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 05:33 AM2017-12-18T05:33:19+5:302017-12-18T05:33:38+5:30

कोरेगाव पार्क परिसरातील पंचतारांकित हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा घालून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे़ नेपाळ व भारतीय अशा दोन तरुणींची सुटका करुन तीन एजंटांवर गुन्हा दाखल केला आहे़

 High profile sex racket in Koregaon Park | कोरेगाव पार्कमधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघड

कोरेगाव पार्कमधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघड

googlenewsNext

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील पंचतारांकित हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा घालून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे़ नेपाळ व भारतीय अशा दोन तरुणींची सुटका करुन तीन एजंटांवर गुन्हा दाखल केला आहे़
सुमन ऊर्फ राज, कुमार आणि रोहित अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देशा, परदेशातील तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक नितीन तेलंगे यांना मिळाली़ त्यावरुन कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या सहकार्याने सामाजिक सुरक्षा विभागाने या हॉटेलवर छापा टाकता़ तेथून दोन तरुणींची सुटका करुन त्यांना रेसक्यू होममध्ये ठेवण्यात आले आहे़
रोहित हा आपल्या साथीदारांच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणच्या तरुणींना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये त्यांच्या नावाने रुम बुक करुन ठेवत असे़ ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना या तरुणींकडे पाठवत असे़ अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक चंद्रकांत जाधव, शीतल भालेकर, कर्मचारी नितीन तेलंगे, नितीन लोंढे, सचिन कदम, रमेश लोहकरे, ननिता येळे, राजेंद्र कचरे, संदीप गायकवाड, सचिन शिंदे, संदीप गिºहे, अनुराधा ठोंबरे, रुपाली चांदगुडे, सरस्वती कागणे यांनी ही कामगिरी केली़

Web Title:  High profile sex racket in Koregaon Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.