शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाची पहिल्यांदाच 'मोक्का' कारवाईला स्थगिती; हॉटेल 'वायकेके'मधील गोळीबार प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 19:25 IST

मोक्का प्रकरणात न्यायालयाने स्थगिती दिलेली ही पहिलीच केस

पुणे : हॉटेल 'वायकेके'मध्ये जून २०१८ मध्ये पहाटेच्यावेळी गोळीबार झाला होता. यासंदर्भात मार्च २०२१ मध्ये हॉटेल मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दाखल गुन्हयासह मोक्का अंतर्गत केलेल्या कारवाईविरूद्ध आरोपी अजय शिंदे याने वकील सत्यम निंबाळकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही केस घटनेच्या 30 महिन्यांनंतर दाखल करण्यात आली असून,  उशिरा केस दाखल करण्याबाबत कोणतेही कारण देण्यात आलेली नाही. तसेच मुंढवा पोलिसांनी तपास करून कोणताच गोळीबार झाला नसल्याचा शेरा नोंदविला आहे. ही कारवाई उशीरा सूडबुद्धधी आणि राजकीय हेतूने केली असल्याचा युक्तिवाद निंबाळकर यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरीत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गुन्हयाच्या तपासाला शनिवारी (दि.१७ ) स्थगिती दिली. मोक्का प्रकरणात न्यायालयाने स्थगिती दिलेली ही पहिलीच केस आहे.

यासंदर्भात हॉटेलचे मालक विशाल सतीश मोदी यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हॉटेलमध्ये पार्टीसाठी आलेल्या निलेशचे स्वागत करण्यासाठी हॉटेलचे मालक रिषभ गुप्ता याने वारंवार अनाऊसमेंट केल्याने सचिन पोटे याचा अहंपणा दुखावला गेला आणि त्याने निलेश चव्हाण याच्यावर जीवघेणा हल्ला करून हॉटेलची तोडफोड केली असे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी सचिन पोटे, अजय शिंदे आणि त्यांच्या साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या केसमध्ये आरोपींवर मोक्का अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली. सत्यम निंबाळकर यांनी अजय शिंदे द्वारे दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन गुन्हयाच्या तपासावर स्थगिती देण्यात आली आहे. पुणेपोलिसांना या गुन्हयात आरोपींवर कोणतीही कारवाई करता येणार नाही. या याचिकेची पुढील सुनावणी 9 सप्टेंबरला होणार आहे.-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबार