शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाने ओढले पाणी वापराबाबत पुणे महापालिकेवर ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 12:50 IST

खडकवासला धरण प्रकल्पातून पुणे महानगरपालिकेने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार पाणी घेणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देनियमांचे पालन होत नाही : राज्य शासनालाही फटकारलेमार्च व एप्रिल या दोन महिन्यामध्ये न्यायालयाने विविध तारखांना या याचिकेवर सुनावणीजलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या काही नियमांबाबत पालिकेला आक्षेपजलसंपदा विभागाने या पूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये आपले प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर केले सादर

पुणे : पुणे महानगरपालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमाचे पालन का करत नाही. तसेच राज्य शासनाकडून याबाबत कार्यवाही का केली जात नाही, असा जाब उच्च न्यायालयाने राज्य शासनाला व पालिकेला विचारला. तसेच पालिकेकडून वापरल्या जात असलेल्या अधिकच्या पाणी वापरावर ताशेरे ओढले.खडकवासला धरण प्रकल्पातून पुणे महानगरपालिकेने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार पाणी घेणे आवश्यक आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून अधिकच्या पाण्याचा वापर केला जात आहे. परिणामी ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणी शिल्लक राहत नाही. त्यामुळे इंदापूरचे सामाजिक कार्यकर्ते प्रताप पाटील यांनी पालिकेच्या अधिकच्या पाणी वापरावर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मार्च व एप्रिल या दोन महिन्यामध्ये न्यायालयाने विविध तारखांना या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. बुधवारी (दि.१०)न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये याचिकाकर्ते प्रताप पाटील यांच्या वतीने शकुंतला वाडेकर यांनी तर पुणे महापालिकेच्या वतीने अभिजित कुलकर्णी यांनी बाजू मांडली.  जलसंपदा विभागाने या पूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये आपले प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर सादर केले आहे. त्यात पालिका जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार पाणी वापरत नसल्याचे नमूद केले आहे. मात्र,राज्य शासनाने व पुणे महापालिकेने अद्याप न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही.पुढील सुनावणी येत्या २४ एप्रिल रोजी होणार आहे.----पुणे महापालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीचे पालन का करत नाही? तसेच शासनाकडून याबाबत कार्यवाही का केली गेली नाही, याबाबत न्यायालयाने जाब विचारला. तसेच पालिकेने पाणी मिळण्यासंदर्भात वेगवेगळ्या माहितीचा पत्रव्यवहार शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे शासनाने बाबात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे,असे आदेश दिले आहेत.पुढील सुनावणी येत्या २४ एप्रिल रोजी होणार आहे.- शकुंतला वाडेकर,याचिकाकर्ता प्रताप पाटील यांच्या  वकिल--पालिका ५० लाख लोकसंख्येला आवश्यक असलेल्या पाण्याचा वापर करत आहे. पालिकेने वेळोवेळी शासनाला अधिक पाणी मिळावे याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. पुणे शहर व परिसरातील गावांमधील लोकसंख्या वाढत असून पालिका प्रशासन आवश्यक तेवढेच पाणी घेत आहे. तसेच जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या काही नियमांबाबत पालिकेला आक्षेप आहे. त्यामुळे पालिका न्यायालयात यावर दाद मागणार आहे,असे म्हणणे पालिकेच्या वतीने बुधवारी न्यायालयासमोर मांडण्यात आले.-अभिजित कुलकर्णी,पुणे महापालिकेचे वकिल  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीHigh Courtउच्च न्यायालय