शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘आता ट्रेलर आहे, नंतर पूर्ण पिक्चर दाखवेन’; दिघीमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 10:55 IST

दिघी येथील दत्तनगर चौपाटीवर शुक्रवारी (दि. २६) रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली....

पिंपरी : आता ट्रेलर आहे, यानंतर पूर्ण पिक्चर दाखवेन, असे म्हणत पूर्ववैमनस्यातून टोळक्याने अंडा बुर्जीच्या गाडीवर काम करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. दिघी येथील दत्तनगर चौपाटीवर शुक्रवारी (दि. २६) रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली.

गौरव बळीराम शेवाळे (३०, रा. शास्त्री चौक, आळंदी भोसरी रोड, दिघी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २७) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शुभम संदीप सोनवणे (२३, रा. आदर्श नगर, दिघी) आणि त्याच्या इतर तीन साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव हे दत्तनगर चौपाटी येथे अंडा बुर्जीच्या गाडीवर काम करतात. शुक्रवारी रात्री काम करत असताना त्यांच्या ओळखीचा शुभम सोनवणे हा त्याच्या इतर तीन साथीदारांसोबत अंडा बुर्जीच्या गाडीवर आला. त्याने जुन्या भांडणाच्या कारणावरून गौरव यांना दगडाने, कोयत्याने, लोखंडी पट्टीने आणि लाथांनी मारहाण करून जखमी केले. ‘तू लायकीत राहायचे नाही तर आता ट्रेलर दाखवला आहे यानंतर पूर्ण पिक्चर दाखवेन’, अशी धमकीही गौरव यांना दिली. हवेत कोयता फिरवत ‘लाल्या भाऊ सोबत पंगा नाही घ्यायचा’ अशी धमकी देत निघून गेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस