शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

PMC: पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा हेमंत रासने यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 14:52 IST

पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती

पुणे : पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. आज सकाळी स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने हेमंत रासने यांची निवड निश्चित असल्याचे सांगण्यात आले होते. अखेर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा हेमंत रासने यांची निवड झाली आहे. 

हेमंत रासने यांनी १० विरूद्ध ६ असा विजय मिळवून राष्ट्रवादीचे उमदेवार प्रदीप गायकवाड यांचा पराभव केला आहे. नगरसेवक हेमंत रासने यांची सलग चौथ्या वेळी अध्यक्षपदावर निवड झाली आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत २८ मार्च रोजी संपली आहे. तर महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे. त्यासाठी १ मार्च ते १४ मार्च या १४ दिवसांसाठी नवे स्थायी समिती अध्यक्ष निवडले गेले आहेत. एकापेक्षा अधिकवेळा स्थायी समिती अध्यक्षपद भूषवणारे रासने हे एकमेव नगरसेवक ठरणार आहेत.

स्थायी समितीमध्ये भाजपचे १०, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत. पीएमपीचे व्यवस्थापक संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते. त्यामुळे रासने यांची निवड ही औपचारिकता होती. तरीही भाजपने दगाफटका होऊ नये यासाठी व्हीप काढला होता. रासने यांचा विजय निश्चित असल्याने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्ते जमा झाले होते. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक