शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

'खाकी वर्दीतली माणुसकी', नोकरीच्या आशेने पुण्यात आलेली ‘ती’ निराधार तरुणी पोलिसांच्या मदतीने झाली सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 13:58 IST

नव्या शहरात आलेल्या, कोणतीही ओळख पाळख नसता ही तरुणी कळत नकळत कोणाचेही सावज बनू शकली असती...

पुणे : बेंगळूरुमधील नोकरी गेलेली, पुण्यात मुलाखतीच्या आशेने ती आलेली, पण मुलाखतीला अजून आठवडा बाकी होता. परक्या शहरात राहायची सोय नाही, हातात फक्त १०० रुपये, अशावेळी बावरलेल्या या तरुणीने एक चांगला निर्णय घेतला. तिने सरळ पोलीस ठाण्याचा रस्ता निवडला. तिची हकिकत जाणून येरवडा पोलिसांनी तिला मदत केलीच त्याचवेळी कोथरुड पोलिसांनी तिची राहण्याची व्यवस्था केली.२४ वर्षांची ही तरुणी मुळची कोलकत्ता येथील राहणारी, बी़ एस्सी, फिजिक्सपर्यंत शिक्षण झालेली़ आॅक्टोंबर २०१९ पासून बेंगळूरु येथील एका कंपनीत नोकरी करीत होती. लॉकडाऊनमुळे तिची नोकरी गेली. तिने हिंजवडी येथील टेक महिंद्रा येथे ऑनलाईन अर्ज केला. २९ जून रोजी तिच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठरला आहे. त्यासाठी ती तिथून थेट पुण्यात आली. परंतु, प्रवास व लॉकडाऊनमधील खचार्मुळे तिच्याकडे केवळ १०० रुपये उरले होते. पुणे स्टेशनला आल्यावर तिच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला.पुण्यात कोणीही ओळखीचे नाही.शेवटी तिने पेईंग गेस्ट म्हणून राहण्याच्या दृष्टीने रुम शोधण्याचा प्रयत्न केला. पण होम क्वारंटाईन शिक्क्यामुळे तिला कोणीच ठेवून घेतले नाही. १८ जून रोजी ती येरवडा पोलीस ठाण्यात पोहचली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी तिची विचारपूस केल्यावर तिने आपली सर्व हकीकत सांगून आपली असहाय्यता व्यक्त केली. तिची अडचण लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम व महिला कर्मचार्‍यांना बोलावून घेऊन तिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या विश्रांती कक्षात राहण्याची व्यवस्था केली. तिच्यासोबत महिला कर्मचारी राजे व रासकर यांना ठेवण्यात आले. १९ जून रोजी तिची नास्ता, जेवणाची व्यवस्था केली. पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी वर्गणी काढून तिला राहण्यासाठी व स्वखर्चासाठी पुरेशी रक्कम गोळा केली. तिच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरु असताना कोथरुड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दशभुजा गणपती मंदिराजवळ एका ठिकाणी तिची राहण्याची सोय केली. तिला महिला कर्मचार्‍यांनी सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पोहचविण्यात आले. नव्या शहरात आलेल्या, कोणतीही ओळख पाळख नसता ही तरुणी कळत नकळत कोणाचेही सावज बनू शकली असती. वेळीच तिने पोलिसांकडे सहाय्य मागितल्याने आज तिचे जीवन किमान सुरक्षित झाले आहे.

 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाITमाहिती तंत्रज्ञानPoliceपोलिस