कोकणवासीयांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST2021-07-11T04:10:01+5:302021-07-11T04:10:01+5:30

पुणे : युगंधर मित्र मंडळ, नूमवि दहावी अ, साईराज प्रतिष्ठान यांच्यावतीने कोकणवासीयांना मदत पाठवण्यात आली. तौक्ते चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग ...

Help to the people of Konkan | कोकणवासीयांना मदत

कोकणवासीयांना मदत

पुणे : युगंधर मित्र मंडळ, नूमवि दहावी अ, साईराज प्रतिष्ठान यांच्यावतीने कोकणवासीयांना मदत पाठवण्यात आली. तौक्ते चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला. किनारपट्टीलगत असलेल्या गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंडळाने या गोष्टींची दखल घेत मदत पाठवली. मालवण तालुक्यातील तारकर्ली आणि देवली या गावांमध्ये १२० कुटुंबांना छत्री आणि चार्जिंग बल्बची मदत करण्यात आली. तसेच, पाच गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. कोरोनामुळे कुटुंबप्रमुख गमावलेल्या ६० कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. ही मदत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि लांजा तालुक्यातील गावांमध्ये करण्यात आली. या वेळी मंडळाचे मयूर पोटे, ऋषिकेश रीसबूड, किरण काळोखे, अनिकेत पवार, शेखर दळवी, अक्षय आढाव, संकेत मोरे, ओंकार देवरूखकर उपस्थित होते.

Web Title: Help to the people of Konkan