शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या मदतीने पतीनेच केला प्रियकराचा खून, तिला विश्वासात घेऊन रचला होता प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 18:58 IST

लग्न झाल्यावरही प्रियकर पत्नीला येत असे भेटायला

ठळक मुद्देपती आणि पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर दिली खून केल्याची कबुली

राजगुरुनगर:  प्रियकराचा प्रेयसीनेच नवऱ्याच्या मदतीने खुन केल्याची घटना उघडकिस आली आहे. महेश वसंत लोहकरे (वय २६ ) रा.गोळी कारखाना समतानगर ता.खेड असे खून झालेल्या प्रियकराचे नांव आहे. याबाबत पोलिसांनी पती पत्नीला दोघांना अटक केली आहे.

महेश लोहकरे यांचे भरत भोरू ढोंगे रा. आव्हाड ( ता. खेड ) यांच्या पत्नीबरोबर पुर्वीपासून प्रेमसंबध होते. ढोंगे बरोबर लग्न झाले तरी लोहकरे यांचे ढोंगे यांच्या पत्नीकडे व घराकडे येणे जाणे सुरूच होते. या दोघांचे काहीतरी प्रेमप्रकरण सुरू यांचा संशय भरत ढोंगे याला आला होता. ढोंगे यांने पत्नीला विश्वासात घेऊन हा प्रकार थांबव असे सांगितले होते. या कारणावरून पती पत्नीत भांडणे झाली होती. तसेच लोहकरे याला दोन वेळा ढोंगे यांने मारहाण केली होती. लोहकरे यांचा काटा काढण्याचा प्लॅन ढोंगे यांने पत्नीला विश्वासात घेऊन रचला होता.

३ एप्रिलला लोहकरे हा महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यावर भरत भोरू ढोंगे याने त्याची बायको पुष्पाबरोबर महेश लोहकरे याचे अनैतिक संबंध आहेत. अशा संशयावरून त्याचा घातपात केला असावा. अशी ६ एप्रिलला खेड पोलिस ठाण्यात मुलांची आई वंदना वसंत लोहकरे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले होते.  यावरुन खेड उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते, पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस हवालदार अंकुश मिसाळ, योगेश भंडारे यांनी तपास सुरू केला. प्रत्येकाचे फोन लोकेशन यांचा तपास करत लोहकरे यांच्या घरच्यांना विश्वासात घेत तपास सुरू केला. ढोंगे यांची पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेऊन उलट तपासणी केली असता, ती घाबरलेली आढळून आली. पोलिसांना संशय येताच पती ढोंगे याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

पोलिसांनी ढोंगे याला सांगितले तुझ्या पत्नीने सर्व काही खरे सांगितले आहे. आम्हाला तु लवकर सांग काय खरे ते खोटे असा पोलिसी खाक्या दाखवल्या. त्याने लगेच लोहकरे यांचा खुन केल्याची कबुली दिली. लोहकरे याला राजगुरूनगर बसस्थानक समोर माझ्या पत्नीने एका रुममध्ये कोंडून घेतले. दरम्यान मला फोन करुन सांगितले. मी व पत्नीचा भाऊ, व एका मित्राच्या मदतीने लोहकरे याला मारहाण केली. तसेच त्याला गाडीत बसवून पत्नीच्या आईवडिलासमोर माफी माग असे सांगुनआंबेगाव तालुक्यातील घनदाट जंगलात नेऊन लोहकरे याला झाडाला फाशी दिली. त्याचा मुत्यदेह  गोहे (ता आंबेगाव )येथे आरोपीच्या घरापासून ३ किलोमीटर अंतरावर जमिनीत पुराला पोलिसांनी ढोंगे व त्यांची पत्नी यांना अटक केली आहे. पुढील तपास खेड पोलिस करित आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक