शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

दैवी शक्तीने बरे करण्याच्या बहाण्याने महिला, सासूवर अत्याचार, साता-याच्या भोंदूबाबाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 9:27 PM

पुणे : दैवी शक्तीच्या सहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, अशा बहाण्याने महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केले व या कुटुंबाचे १२ वर्षे आर्थिक व शारीरिक शोषण करणा-या साता-याच्या भोंदूबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. 

पुणे : दैवी शक्तीच्या सहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, अशा बहाण्याने महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केले व या कुटुंबाचे १२ वर्षे आर्थिक व शारीरिक शोषण करणा-या साता-याच्या भोंदूबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. २००४ सालापासून हा प्रकार सुरू होता.हैदरअली रशीद शेख (वय ४७, रा. कसबा हाईटस, गुरुवार पेठ, जि. सातारा) असे या भोंदूबाबाचे नाव आहे. या प्रकरणी कोंढवा येथील एका महिलेने फिर्याद दिली आहे. १४ डिसेंबर २००४ ते २०१६ दरम्यान पुण्यातील गणेश पेठ, मोमीनपुरा, गुरुनानकनगर, कोंढवा तसेच महाबळेश्वर, रत्नागिरी, श्रीवर्धन, महाड येथील हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही मूळची साता-याची आहे. १९९९ साली तिचा विवाह झाला. पतीचा पुण्यात व्यवसाय असल्याने ते पुण्यात स्थायिक झाले. तिला २००३ मध्ये रक्ताच्या उलट्या होणे, बेशुद्ध होण, चक्कर येणे असा त्रास होत होता. पुण्यातील अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार केल्यानंतरही त्याचा काही परिणाम होत नव्हता. तिच्या सासूला हैदरअली शेखकडे दैवी शक्ती असल्याचे समजल्याने ते शेखच्या संपर्कात आले. त्याने या महिलेच्या पतीलाही आपल्या बोलण्यातून भुलविले.  त्यामुळे तो या शेखच्या नादी लागला. गाडी, जमीन घ्यायची असेल तर तो शेख याच्या सल्ल्यानेच घेत असे आपल्या जाळ्यात तो आला असल्याचे शेख याच्या लक्षात आल्यावर त्याने या महिलेला आजार दूर करतो, त्यासाठी बाहेर जावे लागेल, असे सांगून वेगवेगळ्या ठिकाणी बोलवत असे. त्यांच्याकडून वेळोवेळी मोठी रक्कमही घेत असे. या महिलेबरोबरच त्याने तिच्या सासूचेही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले. त्याचे त्याने व्हिडीओ शूटिंगही केले. त्याने या कुटुंबाकडून ८ लाख रुपये, सातारा येथील फ्लॅट, तीन महागड्या मोटारी, मोटारसायकल, पुणे येथील आॅफिस स्वत:कडे घेतले. ही महिला आणि सासू यांच्यानंतर त्याची नजर त्यांच्या १४ वर्षांच्या मुलीवर पडली. तिच्याशीही त्याने शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. या महिलेने त्याच्यासमोर मुलीला यायचे नाही असे सांगितले, तेव्हा त्याचे डोळे उघडले. त्यानंतर त्यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी शेख याला अटक केली. त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायदा व माहिती व तंत्रज्ञान कायदा, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. खडक पोलिसांनी त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अधिक तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी अधिक तपास करीत आहेत.इंजिनीअर भुलला चौथी पास भोंदूबाबालाहैदरअली शेख हा केवळ चौथी पास आहे. तर फिर्यादी यांचा पती सिव्हिल इंजिनीअर आहे, असे असले तरी शेख याने या इंजिनीअरला पूर्णपणे आपल्या कब्जात घेतले होते. शेख सांगेल, त्यानुसारच तो कोणती गाडी घ्यायची, कोणती जमीन घ्यायची की नाही, याचे व्यवहार करीत असत. या भोंदूबाबाविषयी त्याच्या पत्नीने तक्रार केली होती. पण त्याचा या बाबावर इतका विश्वास होता की त्याने पत्नीच्या तक्रारीवर विश्वासच ठेवला नाही. तो असे करणे शक्य नसल्याचे त्यांना सांगत असे. आपल्याला त्याने हिप्नोटाईज केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरjailतुरुंगArrestअटक