शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 20:29 IST

बुधवारी दिवसभर कडक ऊन असल्याने असह्य उकाडा जाणवत होता.

पुणे \ पिंपरी : पुणे,पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाचनंतर शहरातील वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले. सव्वासहाच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पिंपरीत तर काही ठिकाणी गारांचाही वर्षाव झाला.येत्या काही दिवसांत हवामान विभागाने पर्जन्य वृष्टीचा इशारा दिला आहे. पुणे शहरात सिंहगड रस्ता, कोथरूड, डेक्कन, या परिसरात 

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुणे आणि पिंपरीत शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे सायंकाळी सहानंतर दुकाने बंद करण्यात येतात. ही दुकाने बंद करण्याची लगबग सुरू होती तसेच चाकरमान्यांची देखील घरी जाण्याची तयारी सुरू असतानाच बुधवारी पावसाच्या मुसळधार सरींचे आगमन झाले. त्यामुळे दुकानदार तसेच चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दुचाकी चालकांची कसरत झाली. पावसाच्या अंदाजाने काहीजण  रेनकोट, छत्री या तयारीसह घराबाहेर पडले होते. 

बुधवारी दिवसभर कडक ऊन असल्याने असह्य उकाडा जाणवत होता. मात्र पावसाच्या आगमनामुळे सायंकाळी वातावरणात गारवा निर्माण झाला. यावेळी गारांचा वर्षाव देखील झाला. त्याचा अबालवृद्धांनी आनंद घेतला. सुमारे अर्धा तास पाऊस झाला.

विदर्भ ते दक्षिण तामिळनाडूच्या अंतर्गत भागापर्यंत उत्तर -दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश व लगतचा भाग ते कॉमोरीन क्षेत्र व लगतच्या भागापर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक व केरळमार्गे पसरले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह दक्षिणेतील अनेक राज्यात अवकाळी पावसाचे संकट आले आहे. दक्षिण कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील ४ दिवस पावसाचे राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसweatherहवामान