शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
8
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
9
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
10
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
11
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
12
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
13
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
14
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
15
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
16
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
17
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
18
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
19
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
20
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात

पुणे जिल्ह्यात पावसाची बॅटिंग सुरूच, ओढे नाले तुडूंब, पिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 21:13 IST

जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तसेच बारामती, इंदापुर, दौंड आणि पुरंदर तालुक्यात सोमवारी रात्री तुफान पाऊस झाला.

ठळक मुद्देसोमवारी रात्री तर मंगळवारी मुसळधार हजेरी पावसामुळे मका, ज्वारी, बाजरी आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानसासवडला पावसाच्या पाण्यामुळे ओढ्याला पुर आल्यामुळे रस्ता गेला वाहून

पुणे : गेल्या दोन दिवसांपासुन जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी मतदानाच्या दिशवी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ओढे नाले तुडूब भरून वाहत आहे. मंगळवारी दिवसा आणि सांयकाळी जोरदार झालेल्या पावसामुळे पुणे- नाशिक मार्गावर गुडघाभर पाणी साचले होते. तर पुणे नगर मार्गावर कोरेगाव भीमा येथे पाणी साचल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. या पावसामुळे मका, ज्वारी, बाजरी आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तसेच बारामती, इंदापुर, दौंड आणि पुरंदर तालुक्यात सोमवारी रात्री तुफान पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामाला काहीसा फायदा झाला. मात्र, ज्वारी, बाजरी, मका तसेच काही पिकांचे पावसाच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले. काही ठिकानी रब्बीची पेरणी झाली होती. मात्र, बियाणे पाण्यात भिजल्याने शेतक-यांचे नुकसान होणार आहे.  गेल्या चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. याचाही फटका पिकांना झाला आहे. शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मतदानाच्या दिवशीही पावसाचे संकट होते. मात्र, दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. रात्री १० च्या सुमारास दोन ते तीन तास जोरदार पाऊस झाला. मंगळवारीसुद्धा जोरदार पाऊस झाल्याने अनेक शेतात पाणी साचले होते. ओढ्या नाल्यांनाही मोठ्या पुर आलेला. हवेली तालुक्यात लोणीकाळभोर येथे पुणे सोलापुर महामर्गावर पाणी साचल्याने महामार्गावर संथ गतीने वाहतूक सुरू होती. पुणे- नगर मार्गावरील कोरेगाव भीमा येथे सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्त्याची एक बाजु पाण्याखाली गेली. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून हा एका बाजुने हा मार्ग बंद करण्यात आला. एकाच मार्गिकेवरून दोन्ही बाजुची वाहतूक सुरू असल्याने पुणे नगर मार्गावर ६ ते ७ किमीपर्यंत वाहनांचया रांगा लागल्या होत्या. चाकणला सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे पुणे नाशिक मार्गावर जवळपास गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे वाहतूक ढप्प झाली होती. घोडेगाव व परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. सायंकाळी साडेपाच ते सात दरम्यान ढगफुटी सारखा पाऊस पडला, त्यामुळे काहि काळ मंचर भीमाशंकर रस्ता घोडेगाव जवळ बंद पडला होता. कमी कालावधी मध्ये मोठा पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले. सासवडला पावसाच्या पाण्यामुळे ओढ्याला पुर आल्यामुळे रस्ता वाहून गेला. यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती. बारामती तालुक्यात क-हा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापुर बंधारे ओसंडून वाहू लागले होते. मोरगाव जवळ एका बंधा-याचा भराव पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून  गेला. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊस