शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात पावसाचा जोर कायम : मध्य महाराष्ट्रात मुसळधार, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 21:25 IST

मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़ कोकण, गोव्यात तुरळक ठिकाण मुसळधार पाऊस पडला़.

 

पुणे : मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़ कोकण, गोव्यात तुरळक ठिकाण मुसळधार पाऊस पडला़. विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.सध्या गुजरात, कोकण, मध्य महाराष्ट्रातील मॉन्सूनचा जोर सध्या कमी झाला आहे़. पूर्व राजस्थान, कर्नाटकाच्या किनारी भागात मॉन्सून सक्रीय आहे़. अरबी समुद्राला उधाण आले असून समुद्र खळवलेला असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.कोकणात बहुतांशी ठिकाणी पाऊस पडत असून सध्या त्याचा जोर कमी झाला आहे़. मध्य महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे़ . मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला़ मराठवाड्यातील अर्धापूर, हिमायतनगर, उमरी येथे १० मिमी पावसाची नोंद झाली होती़. विदर्भात अर्जुन मोरगाव ३० मिमी पाऊस पडला असून काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे़. रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे़. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी ११ ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.

गेल्या २४ तासात आजरा १९०, राधानगरी १८०, शिरगाव, महाबळेश्वर १७०, त्र्यंबकेश्वर १५०, पौड मुळशी १४०, ताम्हिणी, दावडी, चंदगड, गारगोटी ११०, अंम्बोणे, वैभववाडी १००, माथेरान, राजापूर, नंदुरबार, पन्हाळा, पाटण, डुंगरवाडी ८०, भोर, गडहिंग्लज, जावळी मेधा, शाहूवाडी, वाणगाव, अप्परवैतरणा, खालापूर, कुडाळ, लांजा ७०, भिरा, शिरोटा, कागल, लोणावळा, पेठ, तळोदा ६० मिमी पावसाची नोंद झाली होती़. 

टॅग्स :weatherहवामानenvironmentपर्यावरणRainपाऊस