मुसळधार पावसाने डोंगर खचले

By Admin | Updated: June 24, 2015 05:23 IST2015-06-24T05:23:27+5:302015-06-24T05:23:27+5:30

पुणे शहर आणि जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने डोंगर खचू लागले आहेत. माळशेज घाटाबरोबरच मुंबई-बंगळुरू महामार्गावर कात्रजचा

Heavy rains lash mountains | मुसळधार पावसाने डोंगर खचले

मुसळधार पावसाने डोंगर खचले

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने डोंगर खचू लागले आहेत. माळशेज घाटाबरोबरच मुंबई-बंगळुरू महामार्गावर कात्रजचा नवीन बोगदा आणि ताम्हिणीत दरडी कोसळल्या. कात्रज बोगद्यातील प्रकाराने दोन दुचाकीस्वार जखमी झाले.
नसरापूर : कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ आज दुपारी दोन दुचाकीस्वार दरड कोसळल्याने जखमी झाले. एस. के. मुश्रीफ (वय २५, मनोहरनगर, चिंचवड) व प्रवीण ज्ञानदेव भोसले (वय २६, रा. विजयनगर, पुणे) हे दोन युवक सातारा बाजूकडून दुचाकीवर पुण्याकडे जात असताना कात्रजच्या नवीन बोगदा ओलांडल्यानंतर या दोघांच्या अंगावर दरड कोसळली. दोघांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर पुण्यात नवले रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेनंतर ही कात्रजच्या डोंगराकडे अजूनही महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने डोंगर उतारावरील माती, मुरूम व दगडगोटे पावसाच्या पाण्याने घसरत महामार्गावर पडल्याने वाहनचालक जखमी होत आहेत.

Web Title: Heavy rains lash mountains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.