शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

अतिवृष्टीचा जिल्ह्यातील अडीचलाख शेतकऱ्यांना तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 20:58 IST

जिल्ह्यामधे जुलै आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले..

ठळक मुद्देएक तृतीयांश क्षेत्र बाधित : पूर-अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्णनिवडणुकीनंतर जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती

पुणे : पूर-अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण क्षेत्राच्या एकतृतीयांशहून (३७ टक्के) अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील १७५० गावांमधील पिकांचे काहीना काही नुकसान झाले असून, जुन्नर, बारामती, आंबेगाव, खेड आणि पुरंदर या तालुक्यांमधे सर्वाधिक नुकसानीची नोंद झाली आहे. त्यामुळे तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. बाधित झालेल्या १ लाख १५ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक बी. जी. पलघडमल यांनी दिली. जिल्ह्यामधे जुलै आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. तसेच, लांबलेल्या पावसामुळे आणि धरणातून नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने बारामती, पुरंदर, शिरुर, दौंड या पर्जन्य छायेच्या तालुक्यातही खूप नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले होते. यंदाच्या खरीप हंगामामधे ३ लाख ६ हजार ६८३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यातील १ लाख १५ हजार ७४६ हेक्टर ७ एकर क्षेत्र बाधित झाले आहे. या पुराचा तडाखा तब्बल २ लाख ४९ हजार ३७६ शेतकऱ्यांना बसला आहे. जुन्नर तालुक्यातील सर्वाधिक २७ हजार ५२३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, तब्बल १८४ गावातील ५६ हजार ५१३ शेतकºयांना फटका बसला आहे. खालोखाल बारामती तालुक्यातील १७ हजार २९ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला आणि खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.  आंबेगाव तालुक्यातील १५ हजार ८२३ हेक्टर आणि खेडमधील १२ हजार १६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तर, पुरंदर तालुक्यातील ११ हजार १४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. वेल्हे तालुक्यात सर्वात कमी ८०९.१२ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. -----------------------

जिल्ह्यातील नुकसान झालेले क्षेत्र

तालुका         बाधित गावे              बाधित शेतकरी    बाधित क्षेत्र (हेक्टर)हवेली              ९६                              १०,९९६             ४१७४.४९    मुळशी           १४८                              ४,७२२              १५४५.३१भोर               १४२                              २,७१०               ५४०.६४मावळ           १७८                              १२,७१४            ५४३६.७९वेल्हा             १२०                              ४२१३                ८०९.१२जुन्नर          १८४                             ५६,५१३              २७,५२३खेड               १८९                            ३५,३८९           १२,१६३.७२आंबेगाव      १४२                             ३२,७७४            १५,८२३.४शिरुर           ९०                                 ७,२१७             ३९९८.४३    बारामती    ११७                                 २९,१७३          १७,२२९इंदापूर        १४१                                 १४,०३३        ७४३१.३७    दौंड             ९८                                  १५,५९४        ७९२२.०६पुरंदर        १०५                                २३,३२८        ११,१४९.३७एकूण        १७५०                              २,४९,३७६    १,१५,७४६.७    

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊस