शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Rain Alert : पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 23:43 IST

मध्यरात्रीनंतर शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता..

पुणे शहरात मंगळवारी रात्री उशिरा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, कर्वेनगर, वाघोली, चंदननगर, येरवडा, वानवडी, पद्मावती परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाळा सुरुवात झाल्यानंतर थोड्याच वेळात शहरातील काही भागातला वीजपुरवठा खंडित झाला.

हवामान विभागाने पुणे शहरात आणखी चार दिवस वृष्टी सांगितली आहे. मध्यरात्रीनंतर शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर, लोहगाव, कात्रज, खडकवासला, वारजे, कोथरुड मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यातील हवेतील आर्द्रता कमी होत असून २३ ऑक्टोबरपासून विदर्भातून मॉन्सूनच्या माघारी सुरुवात होण्याची शक्यता आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यातून मॉन्सूनने माघारी गेला असण्याची शक्यता आहे. त्यादरम्यान, उष्ण हवेमुळे स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती होऊन काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी,कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.२१ ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ २२ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ़२१ ऑक्टोबर रोजी पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पालघर, रत्नागिरी, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, तर बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्घा या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान