शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, गुरुवारी राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 18:18 IST

येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.

ठळक मुद्देमराठवाड्यातील तापमानात काहीशी वाढदेशभरात आसाम, मेघालय, दक्षिण तामिळनाडु आणि केरळला जोरदार पाऊस

पुणे : कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. तसेच गुरुवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे़. गेल्या २४ तासात पणजी  गोंदिया फोंडा या भागात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या स्थानिक हलक्या पावसामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे़. मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे कमाल तापमान सरासरी एवढे नोंदविले आहे़. मराठवाड्यातील तापमानात काहीशी वाढ झाली आहे़. विदर्भातील काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे़. देशभरात आसाम, मेघालय, दक्षिण तामिळनाडु आणि केरळला जोरदार पाऊस होत आहे तसेच पश्चिम बंगाल, ओडिशा येथे तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे़. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, बिहार, आंध्र प्रदेशचा किनारी प्रदेश, कर्नाटकची किनारपट्टी या भागात मेघगर्जनेसह पाऊस होत असून येत्या २४ तासात या परिसरात पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. पुण्यात कमाल व किमान तापमानात घट झाली असून आता ते सरासरी एवढे नोंदविले जात आहे़. बुधवारी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे़. विदर्भात बुधवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता असून गुरुवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़. १८ व १९ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसTemperatureतापमानVidarbhaविदर्भ