शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

'या' कारणामुळे पुण्यात पडतोय ढगफुटीसारखा पाऊस    

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 02:16 IST

रात्री मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पुणेकरांची दैना

पुणे : दिवसा वाढलेले तापमान, त्यामुळे होणारे बाष्पीभवन आणि स्थानिक पातळीवर बदलले वातावरण यामुळे अचानक ढगांची निर्मिती होऊन सध्या जोरदार पाऊस होत आहे. अशा पावसाला ‘क्युमोलोनिंबस क्लाऊड’ असे म्हटले जाते. स्थानिक वातावरणावरुन अशा ढगांची निर्मिती होत असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपि यांनी सांगितले. तसेच पुण्यात गुरूवारी आणि शुक्रवारी ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ‘क्युमोलोनिंबस क्लाऊड’ म्हणजे वरच्या दिशेने जाणारा पाणीदार ढग असे होय. सध्या दोन वेगवेगळ्या सिस्टिम सुरु आहेत. पुणे शहरातील दिवसाच्या तापमान वाढ होत आहे. त्यामुळे बाष्पीभवन वाढते. त्यातून ढग निर्माण होतात. या ढगाची उंची २ ते १५ किमी इतकी असू शकते. तसेच त्याची लांबी ५ ते १० किमी परिसरात इतकी असते. जमिनीवरील तापमान जास्त असल्याने खालून हवा वर जात असते. त्यामुळे हवेच्या दाबामुळे पाणीदार ढगाची निर्मिती होऊ लागते. सायंकाळनंतर तापमान कमी होते. त्यामुळे खालच्या स्तरावरील हवेचा दाब कमी होतो. तसेच पाणीदार ढगांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर बाष्प साठते की, त्यामुळे ते जड होऊ वेगाने खाली येतात आणि मोठ्या टपोऱ्या थेंबासारखा जोरदार पाऊस पडू लागतो. हा पाऊस अत्यंत कमी वेळेत मर्यादित भागात कोसळतो. अशा ढगातून जास्तीत जास्त २ तास पाऊस होतो. अशा ढगांची व्याती किती मोठी आहे, यावरुन त्यातून किती पाऊस पडू शकते, असे ठरते. काही वेळा अशा ढगांमुळे एका तासात १०० मिमी म्हणजेच ढगफुटीसारखे प्रकारही होण्याची शक्यता असते. गेले दोन दिवस याच ‘क्युमोलोनिंबस क्लाऊड’मुळे पाऊस होत आहे.शहरात बुधवारी दिवसभर उन्ह पडले होते. रात्री साडेआठ वाजेपर्यंत फक्त ०.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास गेल्या दोन दिवसांप्रमाणे जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अल्पावधीतच शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. कोथरुड, कर्वेनगर तसेच शहराच्या सर्वच भागातील रस्त्यांवर पाणी साचले असून त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून पोलीस वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत होते. रात्री 9 ते 11. 30 पर्यंत कात्रज मध्ये 70 मिमी तर शिवाजीनगरला 43. 3 मिमी पाऊस झाला होता. मंगळवारी रात्री 3 तासात 54 मिमी पाऊस झाला होता. तर सोमवारी केवळ 1 तासात 46 मिमी पाऊस झाला होता.  

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस