शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील काही भागांमध्ये ढगफुटी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 21:37 IST

जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस

पुणे : एक दिवसाची विश्रांती घेणाऱ्या पावसानं शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला. पुरंदर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून दिवे घाटात ढगफुटी झाली. घाटात डोंगरावरून पाणीच पाणी वाहत होते. बुधवारी संध्याकाळीही असाच पाऊस झाला होता. त्यावेळी भोर तालुक्यातील खेड-शिवापूर परिसरात वेळूफाटा व खेड-शिवापूर परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. सुमारे २ तास झालेल्या पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला. तसंच पुरंदर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला होता. आज दिवसभर पावसाचे सावट होते. मात्र तो बरसला नव्हता. संध्याकाळनंतर पावसाला सुरुवात झाली. खेड तालुक्यात सुमारे तासभर झालेल्या पावसानं सगळीकडे पाणीच पाणी झाले. बारामती शहर परिसरात दुपारी ४ वाजता सुरू झालेला पाऊस सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सुरू होता. आजच्या पावसामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. आजच्या पावसाने हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला. इंदापूर तालुक्यातील निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, पिठेवाडी, सराटी, भगतवाडी या निरा नदीच्या किनाऱ्याशेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज  होती. शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले होते. अखेर आज पाच वाजता  या परिसरात चांगला पाऊस झाला. हवेंली तालुक्यातही सायंकाळी साडेसहा वाजता जोरदार पाऊस झाला. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस