शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Heavy Rain: आळंदीत मुसळधार पाऊस; इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ, तीन पूल वाहतुकीसाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 12:49 IST

लोणावळा परिसरात पावसाचा जोर आणखी वाढल्याने तसेच वडीवळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने इंद्रायणी तुडुंब भरून वाहत आहे

आळंदी : इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून नदीची दोन्ही पात्र तुडुंब भरून वाहत आहेत. नदीच्या महापुराचा परिणाम आळंदीतील नदीलगतच्या घाटांवर झाला आहे. नदीवरील भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला असून भक्त पुंडलिक मंदिरही पाण्यात गेले आहे. अद्यापही इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे. यापार्श्वभूमीवर गुरूवारी (दि.२५) आळंदी पीएमपीएल बस स्थानकाशेजारी नदीवर असलेला जुना पूल, चाकण चौकातून देहू फाट्याकडे जाणारा पूल व सिद्धबेट परिसरातील नवीन पूल असे तीन पूल प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केले आहेत.           पाणलोट क्षेत्रात सततच्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. मात्र बुधवारी (२४) सकाळपासून ही पाणीपातळी अधिकच वाढली होती. त्यानंतर सायंकाळी व रात्रीभर पावसाचा जोर वाढल्याने पाण्याच्या प्रवाहातदेखील मोठ्या गतीने वाढ झाली. पाण्याच्या प्रवाहाने इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलावरील लोखंडी संरक्षण कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता आहे. दरम्यान लोणावळा परिसरात पावसाचा जोर आणखी वाढल्याने तसेच वडीवळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने इंद्रायणी नदीने रुद्रावतार धारण केला आहे. तत्पूर्वी इंद्रायणी घाटावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती.            दरम्यान गुरुवारी सकाळी इंद्रायणी नदीचे पाणी पुलांवर येण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस व नगरपालिका प्रशासनाने इंद्रायणी नदीवरील जुना पूल, चाकण चौकातील मुख्य पूल व सिद्धबेट लगतचा पूल दळणवळणासाठी बंद करण्याचा निर्णय घेऊन रस्त्याला बॅरिकेट लावून सील करण्यात आला आहे. शहराकडे येणारी व पुण्याला जाणारी वाहतूक जुन्या पुलाशेजारील नवीन पुलाच्या रस्त्याने वळविण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून सद्यस्थितीत दुहेरी वाहतूक सुरू आहे. तर इंद्रायणी घाटावर भाविकांनी जाऊ नये यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने इंद्रायणी घाट परिसरात आवश्यक ठिकाणी लाकडी बांबू व लोखंडी पत्रे लावून रस्ते बंद केले आहेत. तर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाऊस वाढत असल्याने इंद्रायणीच्या महापूराकडे नागरिकांनी व भाविकांनी जाऊ नये असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे व वरीष्ठ पोलीस अधिकारी भीमा नरके यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीRainपाऊसindrayaniइंद्रायणीlonavalaलोणावळाDamधरण