केरळ पूरग्रस्तांना नीरा येथून भरीव मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:14 IST2018-08-26T00:13:31+5:302018-08-26T00:14:18+5:30
केरळमध्ये आलेल्या पूरस्थितीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना सरकारी पातळीवर मदत सुरू झाली आहे. पण तेथे रोजच्या गरजेच्या वस्तूंची सध्या वणवण आहे. ही गरज ओळखून नीरा किराणा भुसार व्यापारी असोसिएशनने

केरळ पूरग्रस्तांना नीरा येथून भरीव मदत
नीरा : केरळमध्ये आलेल्या पूरस्थितीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना सरकारी पातळीवर मदत सुरू झाली आहे. पण तेथे रोजच्या गरजेच्या वस्तूंची सध्या वणवण आहे. ही गरज ओळखून नीरा किराणा भुसार व्यापारी असोसिएशनने अकरा हजार रुपये किमतीच्या अत्यावश्यक खाद्यपदार्थांचे पॅकिंग करून, तसेच वेगवेगळ्या व्यावसायिकांनी वस्तू स्वरूपात, तर काही शेतकऱ्यांनी धान्य सेंट जोसेफ चर्च लोणंद यांच्यातर्फे केरळला पाठविण्याची व्यवस्था केली आहे.
नीरा (ता. पुरंदर) येथील किराणा भुसार व्यापारी असोसिएशनने पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तू यामध्ये बिस्किटचे बॉक्स, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, तसेच भरड धान्य असे अकरा हजार रुपये किमतीचे साहित्य पाठवण्याची व्यवस्था केली आहे, तर आदम गोल्डन ग्रुपने ८ हजार ५०० रुपये किमतीच्या किराणा मालाचे साहित्य, चर्मकार संघटनेने दोनशे चपलांचे जोड, तसेच निंबूतचे सरपंच राजकुमार बनसोडे यांनी ३ हजार रुपये किमतीचे साहित्य, कापड व्यावसायिकांनी तीन पोती कपडे, नीरेतील काकडे कुटुंबीयांनी, विविध पतसंस्थांनी व खत व्यावसायिकांनी पंधरा पोती धान्याची, तसेच काही दानशूर व्यक्तींनी बिस्किटाचे बॉक्स दिल्याची माहिती रज्जी जॉर्ज यांनी दिली. लोणंद (ता. खंडाळा) व नीरेतील व्यापाºयांनी एकत्रित, तसेच इतर काही दानशूर व्यक्तींनी दिलेले साहित्य व मदत एका ट्रकमध्ये भरून शनिवारी पाठवण्यात येणार आहे. सभेमध्ये नीरा किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार शहा, हेमंत सोनी, धनंजय पवार, वैभव पवार, विपुल उपस्थित होते.