शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात डेक्कन जिमखान्यावरील चॅम्पियन स्पोटर्सला भीषण आग

By विवेक भुसे | Updated: October 17, 2022 11:40 IST

आधी पावसात माल भिजला, आता अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडला

पुणे : डेक्कन जिमखान्यावरील चॅम्पियन स्पोटर्स या दुकानाला सोमवारी सकाळी भीषण आग लागून त्यात दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. बेसमेटमध्ये लागल्याची आग पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर पसरुन तिने रौद रुप धारण केले होते.  दोन दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसाने डेक्कन जिमखान्यावरील फर्ग्युसन रोडवर गुडघाभर पाणी साठून सर्व दुकानांमध्ये पाणी शिरले होते. त्यानंतर आता चॅम्पियन स्पोटर्समधील सर्व साहित्य आगीमध्ये जळून खाक झाले. चॅम्पियन स्पोटर्सच्या सुरक्षा रक्षकाने सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास दुकानाचा दरवाजा उघडल्यावर आतून धुराचा लोट आला. ते पाहून त्यांनी अग्नीक्षमन दलाला कळविले. पाठोपाठ अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी पोहचल्या. संपूर्ण दुकानात धूर भरला होता. जवानांनी एक्झॉस्ट ब्लोअरचा वापर करुन काचा फोडून धुराला वाट करुन दिली. तेव्हा बेसमेंटमधून धुर येत असल्याचे आढळून आले. बीए किट घालून दोन जवानांना बेसमेंटमध्ये उतरविण्यात आले. त्यांनी स्प्रेचा मारा करुन आग विझविली. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत दुकानातील बेसमेंटमध्ये ठेवलेले कपडे, बुट, प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले. या आगीचा पहिल्या व दुसर्‍या मजल्यावरील साहित्याला मोठ्या प्रमाणावर झळ पोहचली आहे. आता आग पूर्णपणे विझविण्यात आली आहे.

टॅग्स :deccan gymkhanaडेक्कन जिमखानाFire Brigadeअग्निशमन दलPoliceपोलिसRainपाऊस