पुणे : पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहारावरून सुरू असलेल्या वादाच्या प्रकरणाची सुनावणी आज, गुरुवारी (दि.३०) मुंबईच्या धर्मादाय आयुक्तालयात होणार आहे. या सुनावणीत सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि गोखले बिल्डर या दोन्ही पक्षांकडून प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार असून, त्यानंतर धर्मादाय आयुक्त यावर निर्णय देणार असल्याने जैन समाजाचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.
जैन समाजाच्या तीव्र विरोधानंतर बिल्डर विशाल गोखले यांनी या प्रकल्पातून माघार घेण्याची घोषणा केली होती. धार्मिक भावनांचा आदर राखत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र, जोपर्यंत हा करार अधिकृतपणे रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका जैन समाजाने घेतली आहे. सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यामध्ये हा व्यवहार झाला असला तरी या प्रकरणाशी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव जोडण्यात आले. त्यावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या वादात उडी घेतली होती. मोहोळ यांनी जैन बोर्डिंग हाऊसमध्ये जाऊन जैन बांधवांशी संवाद साधला आणि जैन समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले . हा वाद धर्मादाय आयुक्तालयापर्यंत पोहोचला असून, बिल्डर गोखले आणि ट्रस्ट दोन्हींनी या प्रकल्पातून माघार घेण्याबाबत धर्मादाय आयुक्तालयात अर्ज केला आहे. आज (दि.३०) दोन्ही पक्ष एकत्रितपणे प्रतिज्ञापत्र सादर करणार असून, या वादाला आयुक्तांच्या निकालामुळे पूर्णविराम मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : The hearing for the Jain boarding land dispute case is today. Both parties will file affidavits. A builder withdrew after Jain community opposition. The dispute reached the Charity Commissioner. The Commissioner's decision is awaited.
Web Summary : जैन बोर्डिंग भूमि विवाद मामले की सुनवाई आज है। दोनों पक्ष हलफनामा दाखिल करेंगे। जैन समुदाय के विरोध के बाद एक बिल्डर पीछे हट गया। विवाद धर्मार्थ आयुक्त तक पहुंचा। आयुक्त के फैसले का इंतजार है।