शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

डीएसके दाम्पत्याच्या जामिनावर १३ मार्चला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 10:19 PM

पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या डीएसके दाम्पत्याच्या जामिनावर येत्या १३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे़ दरम्यान, डी़ एस़ कुलकर्णी यांच्या वकिलांनी न्यायालयात आपली ८०० कोटी रुपयांची मालमत्ता विक्रीसाठी परवानगी मिळावी, असा अर्ज केला आहे़ 

ठळक मुद्देसरकार पक्षाने मागितला वेळ : मालमत्ता विक्रीची मागितली परवानगीडी़. एस़. कुलकर्णी यांचे वकील चिन्मय इनामदार यांनी सोमवारी न्यायालयात असा अर्ज केला़

पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या डीएसके दाम्पत्याच्या जामिनावर येत्या १३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे़.दरम्यान, डी़. एस़. कुलकर्णी यांच्या वकिलांनी न्यायालयात आपली ८०० कोटी रुपयांची मालमत्ता विक्रीसाठी परवानगी मिळावी, असा अर्ज केला आहे़ ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती यांना गेल्या गुरुवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे़. टी़. उत्पात यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर करून त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे़. यावेळी त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता़. या अर्जाची विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे़. टी़. उत्पात यांच्यासमोर सुनावणी झाली़ सरकार पक्षाने जामीन अर्जावर आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मिळावा, अशी विनंती केली़ त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी १३ मार्च रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले़. दरम्यान, ठाणे येथील एका मालमत्तेच्या प्रकरणात डी़ एस़ कुलकर्णी यांना ६ कोटी ५५ लाख रुपये मिळणार आहेत़ ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी हे पैसे मिळावेत, असा अर्ज डी़. एस़. कुलकर्णी यांचे वकील चिन्मय इनामदार यांनी सोमवारी न्यायालयात केला़ यावर आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस अधिकारी नीलेश मोरे यांनी मुंबई पोलिसांना ही रक्कम हवी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले़ त्यावर येथील न्यायालयाने आम्ही प्रथम अर्ज केला आहे़; त्यामुळे ही रक्कम पुण्यातील ठेवीदारांना मिळावी, असे म्हणणे डी़.एस.क़ुलकर्णी यांच्या वकिलांनी मांडले़.याशिवाय, डीएसके यांची ८०० कोटी रुपयांची मालमत्ता विकण्यास परवानगी मिळावी़. ती ४२ लाख स्क्वेअर मीटर जागा असून त्यात जमीन, इमारतींचा समावेश आहे़.या मालमत्तेच्या विक्रीतून आलेले पैसे आम्ही न्यायालयात जमा करतो़. त्यातून सध्या ठेवीदारांची २३२ कोटी रुपयांची असलेली थकबाकीची रक्कम देता येईल, अशी विनंती गुरुवारी न्यायालयाला केली असल्याचे अ‍ॅड़. चिन्मय इनामदार यांनी सांगितले़. या अर्जांवरही १३ मार्चला सुनावणी होईल. 

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीCourtन्यायालय