शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या तक्रारी, अडचणीं ऐकून घेण्यासाठी पीएमपीकडून पुन्हा '' प्रवासी दिना'' ला साद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 12:57 IST

यापूर्वी अनेकदा प्रवासी दिनाला सुरूवात करून काही दिवसांतच बंद करण्याची परंपरा आहे.

ठळक मुद्देपीएमपीकडून आयोजन : ई-कनेक्ट अ‍ॅपवरही तक्रार करण्याची सुविधा ‘दीन’ प्रवाशांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी प्रशासन किती दिवस तत्परता दाखवणार हा प्रश्न दर महिन्याला यादिवशी दुपारी ३ ते ५ यावेळेत प्रवाशांना थेट अधिकाऱ्यांना भेटता येईलबस, मार्ग, चालक, वाहक, चेकर,यांसह कोणत्याही बाबतीत तक्रारी तसेच सुचना करता येणार

पुणे : प्रवाशांच्या तक्रारी, अडचणीं ऐकून घेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पुन्हा प्रवासी दिनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यापूर्वी अनेकदा प्रवासी दिनाला सुरूवात करून काही दिवसांतच बंद करण्याची परंपरा आहे. त्यामुळे ‘दीन’ प्रवाशांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी प्रशासन किती दिवस तत्परता दाखवणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.‘पीएमपी’चा स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष आहे. प्रवासी, सर्वसामान्य नागरिक या कक्षाकडे दुरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष जाऊन तक्रार करता येते. तसेच ई-कनेक्ट अ‍ॅपवरही तक्रार करण्याची सुविधा आहे. पण अनेक प्रवासी तक्रार करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना आलेल्या अडचणींबाबत पीएमपीकडे दाद मागत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक आगारामध्ये प्रवासी दिनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवस प्रमुख बसस्थानकांमध्ये प्रवासी दिन घेण्यात येत होता. त्यासाठी ठिकठिकाणी वरिष्ठ अधिकाºयांची नेमणुकही करण्यात आली होती. प्रवाशांनी सांगितलेल्या अडचणी व तक्रारी नोंदवून घेत त्याचे तातडीने निराकरण करणे हा त्यामागचा उद्देश होता. या सर्व तक्रारींची काही प्रमाणात दखलही घेतली जायची. पण यामध्ये कधीच सातत्य राहिले नाही.नवीन अधिकारी आल्यानंतर या दिनाची येत होती. त्यानुसार काही दिवस प्रवाशांना मान मिळायचा. पण ‘नव्याचे नऊ दिवस’ याप्रमाणे प्रवासी पुन्हा दीन होतात, हे आतापर्यंत घडत आले आहे. आता प्रशासनाने जून महिन्यापासून पहिल्या शनिवारी पुन्हा प्रवासी दिनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ आगार प्रमुखांच्या कार्यालयात प्रवाशांच्या तक्रारी, सुचना ऐकून घेतल्या जाणार आहेत. दर महिन्याला यादिवशी दुपारी ३ ते ५ यावेळेत प्रवाशांना थेट अधिकाऱ्यांना भेटता येईल. बस, मार्ग, चालक, वाहक, कंट्रोलर, चेकर, मेकॅनिक यांसह कोणत्याही बाबतीत तक्रारी तसेच सुचना करता येतील. या तक्रारींवर तात्काळ चौकशी व कारवाई होणार आहे. तसेच तक्रारींची दखल घेऊन मध्यवर्ती कार्यालयाकडून त्याचा निपटारा केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलTravel Tipsट्रॅव्हल टिप्स