सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
By Admin | Updated: July 10, 2014 22:51 IST2014-07-10T22:51:25+5:302014-07-10T22:51:25+5:30
येथील कै. चंदुवस्ताद चौक परिसरात बंगला साईडला रेल्वे कॉलनीत सांडपाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहे.

सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
दौंड : येथील कै. चंदुवस्ताद चौक परिसरात बंगला साईडला रेल्वे कॉलनीत सांडपाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. त्यातच हे सांडपाणी सार्वजनिक नळकोंडाळ्याला जाऊन मिळत असल्याने येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवावा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
रेल्व कॉलनी परिसरात ऋतुविहार ही कॉलनी असून, या कॉलनीतील सांडपाणी रस्त्याने वाहत कै. चंदुवस्ताद चौकात जाते. या परिसरात रेल्वे वसाहतीसाठी नगर परिषदेने सार्वजनिक नळ दिलेला आहे. मात्र, या सार्वजनिक नळ कोंडाळ्याभवती ऋतुविहार कॉलनीतील सांडपाणी वाहत येते. त्यामुळे रस्त्यावर सांडपाणी साचून दरुगधी सुटली आहे. परिणामी या भागातील रहिवाशांना वावर करणो असाह्य झाले आहे.
त्यातच मुलांना बाहेर खेळण्यासाठी पालक पाठवत नाही. कारण, या दरुगधीयुक्त पाण्यामुळे या भागातील मुले आजारी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. तेव्हा सांडपाण्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी, रहिवाशी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला तालुका सरचिटणीस राणी ओव्हाळ यांनी
केली आहे. (वार्ताहर)
ऋतुविहार या सोसायटीमधून
सांडपाणी येत असेल, तर याबाबत योग्य ती दखल घेऊन परिसरात सांडपाणी येणार नाही, याची व्यवस्था केली जाईल.
- शिवाजी कापरे, मुख्याधिकारी