शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
6
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
7
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
8
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
9
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
10
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
11
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
12
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
13
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
14
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
15
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
16
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
17
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
18
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
19
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
20
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिकेसह विविध संस्था, संघटनांची आरोग्य यंत्रणा सज्ज      

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 8:05 PM

शहरात तातडीच्या १०८ रुग्णवाहिकेद्वारेदेखील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच अन्य भागांत सुमारे २७ ठिकाणी वैद्यकीय सेवा दिल्या जाणार आहेत....

ठळक मुद्देआपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व यंत्रणेसह १० डॉक्टर व ४ परिचारिकांची टीम सज्जशनिवारवाड्याजवळील सूर्य सह्याद्री रुग्णायात तातडीची वैद्यकीय सेवा

पुणे : ‘बाप्पांना वाजत गाजत निरोप देण्यासाठी उद्या (12 सप्टेंबर) अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. मिरवणुकीत भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागासह विविध संस्था, संघटनांकडून वैद्यकीय सेवा पुरविल्या जाणार आहेत.      महापालिकेच्या वैद्यकीय दवाखान्यांमध्ये अत्यावश्यक सुविधा देण्याबरोबरच डॉक्टर्स स्कॉड, खासगी रूग्णालयांमध्ये काही खाटा आरक्षित ठेवणे तसेच तातडीच्या 108 रूग्णवाहिका देखील तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच कोटणीस दवाखान्याबाहेर डिजीटल प्रेझेटेंशन दाखविण्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती  महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुख डॉ.रामचंद्र हंकारे यांनी दिली.    पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाकडून यंदाच्या वर्षीही वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे.  मिरवणूक मार्गावर चार ठिकाणी रुग्णवाहिका व सहा ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय सुविधा तैनात ठेवल्या जाणार आहेत. बेलबाग, एसपी कॉलेज, अलका टॉकीज व पूरम चौक(टिळक रस्ता) या ठिकाणी रुग्णवाहिकेद्वारे तसेच  गोखले हॉल लक्ष्मी रस्ता, नारायणपेठ पोलिस चौकी केळकर रस्ता, ग्राहकपेठ टिळक रस्ता, स्वीट होम कुमठेकर रस्ता, दत्तवाडी रस्ता, आयुर्वेद रसशाला कर्वे रस्ता या ठिकाणीही सेवा देण्यात येणार आहे.शहरात तातडीच्या १०८ रुग्णवाहिकेद्वारेदेखील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच अन्य भागांत सुमारे २७ ठिकाणी वैद्यकीय सेवा दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये अलका चौक, बेलबाग चौक, नगरकर तालीम चौक, मंडई, नारायण पेठ पोलिस चौकी, नागनाथ पार सदाशिव पेठ, झेड ब्रीज, शनिवार वाडा, स. प. कॉलेज, विजय टॉकीज चौक, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड, तसेच खडकवासला धरण या ठिकाणी रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. त्याशिवाय पिंपरी-चिंचवड, थेऊरमध्येही रुग्णवाहिका असणार आहेत, अशी माहिती १०८ रुग्णवाहिकेच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

    निरंजन सेवा भावी संस्थेच्या वतीने फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात मिनी रुग्णालय उभारण्यात आले आहे. येथे गणेशोत्सवात येणा-या भाविकांसह पोलिसांना वैद्यकीय सेवा देण्यात येते. वैद्यकीय यंत्रणेसह १४ जणांची टीम यामध्ये कार्यरत आहेत. या मिनी रुग्णालयात सर्व प्रकारची औषधे, इंजेक्शन, सलाइन, बेड यासह अद्ययावत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महिलांसाठी स्वतंत्र विभाग केला आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व यंत्रणेसह १० डॉक्टर व ४ परिचारिकांची टीम सज्ज आहे. हा उपक्रम गणेशोत्सवात गणेश विसर्जनापर्यंत विनामूल्य सुरू राहणार आहे. या रुग्णालयाजवळ रुग्णवाहिका सज्ज असेल, तसेच शनिवारवाड्याजवळील सूर्य सह्याद्री रुग्णायात तातडीची वैद्यकीय सेवा दिली जाईल. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे जयेश कासट यांनी केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Visarjanगणेश विसर्जनMedicalवैद्यकीयHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका