पुणे पालिकेकडे अडीच कोटींची बिले थकल्याने थांबविली आरोग्य सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 12:59 PM2019-09-09T12:59:54+5:302019-09-09T13:04:28+5:30

ठेकेदार व पालिकेच्या या सावळ्या गोंधळात हजारो रुग्णांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Health services stopped of Pune Municipal Corporation due to pending 2 crore and fifty lakhs | पुणे पालिकेकडे अडीच कोटींची बिले थकल्याने थांबविली आरोग्य सेवा

पुणे पालिकेकडे अडीच कोटींची बिले थकल्याने थांबविली आरोग्य सेवा

Next
ठळक मुद्देरुग्णांचे हाल : दहा दिवसांपासून पालिकेच्या रुग्णालयांमधील लॅब कलेक्शन केले बंदमहापालिकेचे शहरात छोटे-मोठे असे एकूण ७० दवाखाने आणि १४ प्रसूतिगृहे

लक्ष्मण मोरे -  
पुणे : महानगरपालिकेला पॅथॉलॉजी, डायग्नोसिस आणि रेडिओलॉजीची (एक्स-रे) सेवा पुरविणाऱ्या ठेकेदाराने ३० ऑगस्टपासून सेवा देणे बंद केले आहे. पालिकेच्या गलथान कारभाराचा फटका रुग्णांना सहन करावा लागत असून ठेकेदाराने त्याची पालिकेकडे  अडीच कोटींची थकबाकी असल्याचा दावा केला आहे. ठेकेदार व पालिकेच्या या सर्व गोंधळात हजारो रुग्णांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिकेचे शहरात छोटे-मोठे असे एकूण ७० दवाखाने आणि १४ प्रसूतिगृहे आहेत. या दवाखान्यांमध्ये रुग्णांची रक्त, लघवी आदी नमुने घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आरोग्य विभाग, लेखापरीक्षण विभाग व ठेकेदार यांच्या समन्वयाअभावी हजारो रुग्णांचे हाल होत आहेत. सर्व दवाखान्यांमधील रक्त, लघवीचे नमुने घेण्याची व एक्स-रे काढण्याची सेवा ठप्प झाल्याने नाईलाजास्तव नागरिकांना खासगी रुग्णालयांमधून या तपासण्या करून घ्याव्या लागत आहेत. पालिकेच्या दवाखान्यांमध्ये शहरी गरीब योजना, अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचे लाभार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या या तपासण्या मोफत केल्या जातात. परंतु, ३० ऑगस्टपासून ही सेवा बंद असल्याने हजारो रुग्णांना खासगी लॅबमध्ये पैसे खर्च करावे 
लागत आहेत.
कृष्णा डायग्नोसिस सर्व्हिसेस यांना पॅथॉलॉजी, डायग्नोसिस आणि रेडिओलॉजी सेवा पुरविण्याचे कंत्राट दिलेले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू व्हायला सहा महिन्यांचा कालावधी गेला. तेव्हापासून कृष्णा डायग्नोसिस सर्व्हिसेसकडून सेवा दिली जात आहे. पालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालये व प्रसूतिगृहांमधून थुंकी आणि एचआयव्ही वगळता अन्य सर्व प्रकारचे नमुने घेतले जातात. पालिकेने त्यांच्यासोबत करार केलेला आहे. पालिकेने ठेकेदाराला सर्व दवाखान्यांमध्ये आवश्यकतेनुसार पॅथॉलॉजी लॅबसाठी जागाही उपलब्ध करून दिलेली असून त्यांना पालिकेकडून सेवेपोटी पैसेही देतात. या सेवा रुग्णांना मोफत देणे अपेक्षित आहे.
परंतु, तब्बल अडीच कोटींची बिले थकल्याचा दावा ठेकेदाराने केला आहे. कोट्यवधींची थकबाकी असून बिले वेळेत मिळत नसल्याने मोफत सेवा बंद करण्यात येत असल्याची नोटीस पालिकेला दिली होती. ही नोटीस मिळताच पालिकेच्या आरोग्य विभागानेही ठेकेदाराला नोटीस बजावत सेवा बंद न करण्याविषयी कळविले. परंतु, पालिकेला नोटीस बजावल्यानंतर तत्काळ सेवा खंडित केली. वास्तविक करारामध्ये एक महिन्याआधी नोटीस देण्याची अट ठेकेदाराकडून पाळली गेली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता आरोग्य विभागाकडे बिले थकीत नसून लेखापरीक्षण विभागाकडे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Health services stopped of Pune Municipal Corporation due to pending 2 crore and fifty lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.