शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

किशोरी आरोग्य कोश गावोगावी पोहोचविण्याच्या आश्वासनाचा आरोग्यमंत्र्यांना विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 4:17 PM

खेडोपाड्यातील शाळांपर्यंत किशोरी आरोग्य कोश पोहोचविला जाईल या या कोशाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी दिलेल्या आश्वासनाचा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनाच विसर पडला आहे.

ठळक मुद्देआश्वासनाच्या पूर्ततेकडे डोळे लावून बसले आहेत कोशाचे निर्मितीकारकिशोरी आरोग्य कोशाचे तयार केले जात आहे संकेतस्थळ

पुणे : उमलत्या वयात मुलींना अनेक शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागत असल्याने पालक, मार्गदर्शक आणि शिक्षकांना या टप्प्याची माहिती व्हावी यासाठी निशिगंधा वाड एज्युकेशन ट्रस्टने किशोरी आरोग्य कोश निर्मित केला आहे. परंतु खेडोपाड्यातील शाळांपर्यंत हा कोश पोहोचविला जाईल या या कोशाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी दिलेल्या आश्वासनाचा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनाच विसर पडला आहे. कोशाचे निर्मितीकार या आश्वासनाच्या पूर्ततेकडे डोळे लावून बसले आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे किशोरवयीन मुलींमध्ये नैसर्गिक काळापूर्वीच झपाट्याने मानसिक आणि शारीरिक बदल होताना दिसत आहेत. हीच किशोरवयीन मुलगी उद्याची माता होणार असल्याने तिचे आरोग्य सदृढ राखले तर राष्ट्राचे आरोग्य उत्तम राहाणार आहे. याच भूमिकेतून ट्रस्ट आणि डिंपल प्रकाशनने पहिल्यांदाच ‘किशोरी आरोग्य कोशा’ची निर्मिती केली आहे. किशोरवयीन मुलींमध्ये मानसिक आणि शारीरिक होणा-या महत्वपूर्ण बदलांची माहिती पालकांबरोबरच शिक्षकांनाही होणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी हा कोश खेडोपाड्यांच्या शाळांमध्ये पोहोचणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे शाळांमध्ये या कोशाचे वाटप केले जावे असा प्रस्ताव कोशाच्या संपादिका आणि विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी आरोग्यमंत्र्यांना सादर केला होता. या कोशाच्या प्रकाशन समारंभात आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी या कोशाचे कौतुक करून खेडोपाड्यातील शाळांमध्ये हा कोश पोहोचविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरी आश्वासनांची पूर्तता अद्याप झाली नसल्याचे डॉ. विजया वाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

येत्या एप्रिलपर्यंत किशोरी आरोग्य कोशाचे संकेतस्थळ पूर्णत्वासकिशोरी आरोग्य कोशाला वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे जगभरातील लाखो लोकांपर्यंत हा कोश पोहोचविण्याच्या हेतूने किशोरी आरोग्य कोशाचे संकेतस्थळ तयार केले जात आहे. या कोशामध्ये विविध विषयांवर लेख लिहिलेल्या प्रत्येक डॉक्टरांचे श्राव्य स्वरूपात विचार ऐकता येणार आहेत. प्रगती बाणखेले आणि सुखदा चित्रे या दोघींनी प्रत्येक डॉक्टरांची ओळख करून दिली आहे. जगभरामध्ये संकेतस्थळाच्या माध्यमातून घरोघरी हा कोश पोहोचविला जाणार आहे. हे संकेतस्थळ येत्या एप्रिलपर्यंत पूर्णत्वास येणार असल्याची माहिती डॉ. विजया वाड यांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणे