शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा घेणार सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 18:48 IST

महापालिकेने पुढील काही महिन्यांकरिता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय

ठळक मुद्देमागील पाच वर्षातील सेवानिवृत्तांची यादी काढणार 

पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागापुढे या आपत्तीसोबत लढण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे. एकीकडे जबाबदाऱ्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र मनुष्यबळ कमी पडू लागले आहे. त्यामुळे मनुष्यबळाची ही चणचण दूर करण्यासाठी महापालिकेने पुढील काही महिन्यांकरिता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील पाच वर्षात सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना मदत घेतली जाणार आहे.केवळ पुणे महापालिकाच नाही तर राज्यातील अन्य महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांनाही मनुष्यबळाचा प्रश्न भेडसावत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यामध्ये वाढत चालला आहे. रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामांचा डोंगर उभा राहिलेला असताना ही कामे आणि जबाबदाऱ्या पाडण्यास कर्मचारी संख्या कमी पडू लागली आहे. त्यामुळे राज्य शासनानेच याबाबतचे आदेश दिले आहेत.आरोग्य विभागातून गेल्या पाच वर्षात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना नियुक्त करताना त्यांची काम करण्याची ईच्छा असेल तरच त्यांना सेवेत घेतले जाणार आहे. यासोबतच त्यांचे आरोग्यही तपासण्यात येणार आहे. महापालिकेमधील शेकडो पदे रिक्त आहेत. शासनमान्यता नसल्याने ही पदे भरता येत नाहीत. महापालिकेच्या आरोग्य विभागातील सुमारे ५० टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली. मात्र, या भरतीसाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे पालिकेने सेवानिवृत्त कर्मचा-यांना पुन्हा तात्पुरत्या सेवेत रुजू करुन घेण्याचे ठरविले आहे. शासनाने पालिका कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० केले आहे. त्यामुळे मागील दोन वषार्तील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची वाढीव मुदत या कालावधीत देणे शक्य आहे का याचाही विचार प्रशासनाकडून सुरु आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागात वर्ग - १ ची १२३ पदे तातडीने भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार, या पद भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची ही पदे भरताना शैक्षणिक पात्रतेसह अनुभवाचा विचार केला जाणार आहे. या मुलाखती स्काईप, व्हिडीओ कॉलिंग आणि अन्य ऑनलाइन सुविधांचा वापर करुन घेतल्या जाणार असल्याचे वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका