द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या वतीने आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST2021-03-15T04:11:38+5:302021-03-15T04:11:38+5:30

पुणे : दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या वतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वकील, कोर्टाचे कर्मचारी, पोलीस तसेच पक्षकार ...

Health camp on behalf of The Family Court Lawyers Association | द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या वतीने आरोग्य शिबिर

द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या वतीने आरोग्य शिबिर

पुणे : दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या वतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वकील, कोर्टाचे कर्मचारी, पोलीस तसेच पक्षकार यांच्यासाठी कौटुंबिक न्यायालय येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले.

या शिबिरामध्ये हिमोग्लोबीन, उच्च रक्तदाब, मधुमेह, ऑक्सिजन लेव्हल, डब्लूबीसी, प्लेटलेटस, तापमान, वजन यांची तपासणी केली. यासाठी अल्फा लॅबोरेटरीजचे सहकार्य लाभले. सर्वांचे रिपोर्ट फॅमिली कोर्टच्या अध्यक्ष वैशाली चांदणे यांच्यातर्फे विनामूल्य देण्यात आले.. यावेळी फॅमिली कोर्टचे उपाध्यक्ष अँड. संजय डोंगरे, उपाध्यक्षा अँड. प्रगती पाटील, सहसचिव अँड. गीता निकाळजे, खजिनदार अँड. विजय सरोदे तसेच वकील वर्ग, ज्युनिअर वकील आणि कर्मचारी उपस्थित होते.

फॅमिली कोर्ट हे कायदेशीर काम करण्याबरोबरच सामाजिक उपक्रम राबवीत असते. चांदणे या गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवीत आहेत.

Web Title: Health camp on behalf of The Family Court Lawyers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.