डोक्यात दगड घालून लांबविला मोबाईल
By Admin | Updated: July 3, 2017 03:30 IST2017-07-03T03:30:12+5:302017-07-03T03:30:12+5:30
तरुणाला शिवीगाळ करीत डोक्यात दगड घालून मोबाईल चोरून नेण्यात आल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोघा जणांना अटक केली

डोक्यात दगड घालून लांबविला मोबाईल
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तरुणाला शिवीगाळ करीत डोक्यात दगड घालून मोबाईल चोरून नेण्यात आल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. हा प्रकार ३० जून रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास आरटीओ चौकातील पेट्रोल पंपासमोर घडला.
विक्रम संजय ठाकूर (वय २८), आनंद दिलीप शिंदे (वय २४, रा. शिंदे छत्री, वानवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजेश भोरे (वय ३८, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. भोरे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्या वेळी आरोपी दुचाकीवरून त्यांच्या जवळ आले. त्यांनी भोरे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्या डोक्यात दगड मारला. त्यांना जखमी करून मोबाईल हिसकावून घेत पळ काढला होता. पोलिसांनी त्यांना अटक केली असून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर झालेल्या दुसऱ्या घटनेत एकाचा मोबाईल दुचाकीस्वार तरुणांनी चोरून नेला. ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी मनीष भंडारी (वय ४१, रा. मार्केट यार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. भंडारी एनआयबीएम रस्त्याने पायी जात होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी त्यांच्याजवळचा
मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.