शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हेड अ‍ॅन्ड नेक कर्करोगाच्या उपचाराला ‘बळ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 21:18 IST

राज्य शासनाने तीन महाविद्यालयांना एकुण २ कोटी ६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे रुग्णांना योग्यप्रकारे उपचार करणे शक्य होणार आहे.

ठळक मुद्देशासकीय महाविद्यालयांमधील आवश्यक उपकरणांची माहिती संकलित पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वाधिक ९८ लाख ४९ हजार रुपये मंजुरउपकरणांची खरेदी झाल्यानंतर कर्करोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार

पुणे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘हेड अ‍ॅन्ड नेक’ (डोके आणि घसा) कर्करोगावर उपचारासाठी अत्याधुनिक उपकरणे मिळणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाने तीन महाविद्यालयांना एकुण २ कोटी ६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे रुग्णांना योग्यप्रकारे उपचार करणे शक्य होणार आहे.पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासह मुंबईतील ग्रॅन्ट महाविद्यालय आणि नागपुर शासकीय महाविद्यालयांचा यामध्ये समावेश आहे. या रुग्णालयांमध्ये हेड अ‍ॅन्ड नेक कर्करोगावर उपचार केले जातात. त्यामध्ये तंबाखुजन्य पदार्थांमुळे जीभ, गाल, घसा, तोंडाला होणाऱ्या कर्करोगाचा समावेश आहे. मात्र, या रुग्णालयांमध्ये सध्या काही उपकरणे अत्यंत जुनी आहेत. तर काही उपकरणे महागडी असल्याने अद्यापही उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे कर्करोगावर परिपुर्ण उपचार करणे शक्य होत नव्हते. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाकडून काही दिवसांपासून संबंधित शासकीय महाविद्यालयांमधील आवश्यक उपकरणांची माहिती संकलित केली जात होती. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांकडून गरजेनुसार उपकरणांची माहिती दिली. त्याप्रमाणे विभागाने सर्व यंत्रसामुग्रीची खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यासाठी एकुण २ कोटी ६ लाख ३७९ रुपये मंजुर करण्यात आले आहेत.पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वाधिक ९८ लाख ४९ हजार रुपये मंजुर करण्यात आले आहेत. त्यातून विविध प्रकारची १२ उपकरणे खरेदी केली जाणार आहेत. ग्रॅन्ट महाविद्यालयाला आठ उपकरणांसाठी ५१ लाख ३९ हजार ३७९ तर नागपुर महाविद्यालयाला नऊ उपकरणांसाठी ५६ लाख ४० हजार रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. ही यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी मंजुरी मिळाल्याने संबंधित रुग्णालयांमधील कर्करोगावरील उपचार परिपुर्ण होणार आहेत. यापुर्वी या उपचारांना अनेक मर्यादा येत होत्या. संबंधित उपकरणांअभावी रुग्णांना खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागत होती. परिणामी, त्यांच्यावरील खर्चाचा बोजाही वाढत होता. आता या उपकरणांची खरेदी झाल्यानंतर कर्करोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.---------------

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यcancerकर्करोगState Governmentराज्य सरकारhospitalहॉस्पिटल