शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune: कॅनडात नोकरी लागल्याचे सांगून तो विमानतळावर गेला अन् अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 13:05 IST

आई वडिलांना दाखविण्यासाठी त्याने कॅनडात नोकरी लागल्याचे सांगितले...!

पुणे : नोकरी गेल्याने त्याला अमेरिकेहून घरी यावे लागले होते. आई वडिलांना दाखविण्यासाठी त्याने कॅनडात नोकरी लागल्याचे सांगितले. बनावट तिकीट व व्हिसाही तयार केला. आपण खरेच कॅनडाला जात असल्याचे दाखविण्यासाठी त्याने लोहगावविमानतळावर प्रवेशही केला. तेथून बाहेर पडत असताना सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्याने तो अडकला. बनावट तिकीट व कॅनडाचा बनावट व्हिसा तर करुन त्याचा गैरवापर करणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. 

याप्रकरणी लोहगाव विमानतळावरील शिफ्ट इन्चार्ज अरविंदकुमार सिंग यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथे राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणाची २०१९ मध्ये नोकरी गेली. त्यामुळे त्याला अमेरिकेहून परत पुण्याला यावे लागले होते. त्यानंतर काही महिन्यातच लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे त्याला कोठेही नोकरी न मिळाल्याने गेली २ वर्षे तो घरीच होता. आपण आई वडिलांवर बोझ बनलो आहोत, अशी बोच त्याच्या मनात लागून राहिली होती. त्यामुळे त्याने घरी कॉम्प्युटरवर कॅनडाचा बनावट व्हिसा तयार केला. तसेच पुणे ते दिल्ली व दिल्ली ते व्हॅनकुवर (कॅनडा) असे एअर इंडियाचे बनावट तिकीटही तयार केले. आपल्या आईवडिलांना त्याने आपल्याला नोकरी लागल्याचे व आपण कॅनडाला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे आई वडिलांना आनंद झाला.

९ डिसेबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास या तरुणाचे आईवडिल त्याला सोडण्यासाठी विमानतळावर आले. त्यामुळे त्याला विमानतळामध्ये प्रवेश करावा लागला. दुपारी साडेचार ते सायंकाळी सव्वासात वाजेपर्यंत तो विमानतळाच्या लॉबीतच थांबून राहिला. त्यानंतर तो पुन्हा आत प्रवेश करतात, तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा सुरक्षा रक्षकांना संशयास्पद वाटले. त्यांनी चौकशी केल्यावर त्याच्याकडील तिकीट व व्हिसा बनावट निघाला. त्यानंतर त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले.

 अटक झाली तरीही मुलगा वाचल्याचे समाधाननोकरी नसल्याने अस्वस्थ असलेल्या या तरुणाने आईवडिलांना बरे वाटावे, म्हणून हा सर्व उद्योग केला असल्याचे पोलिसांना समजल्यावर त्यांनाही त्याचे दु:ख वाटले. त्यांनी विमानतळाबाहेर पडल्यावर काय करणार होता, असे विचारल्यावर या तरुणाने नक्की काही ठरविले नाही. मित्रांकडे जाणार होतो, असे सांगितले. या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याने पुढे काही बरे वाईट केल्याचे समजण्यापेक्षा तो पकडला गेल्याने आता डोळ्यासमोर तरी राहिल, याचेच त्याच्या आईवडिलांना समाधान आहे.

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळpune airportपुणे विमानतळLohgaonलोहगावCrime Newsगुन्हेगारी